दि.30,BY,POL,मुरबाड-
गेली अनेक वर्ष मुरबाड महसूल विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला दिसून येत आहे. सामान्य शेतकऱ्यांना आपल्या वडिलोपार्जित जमिनी विषयी कामासंबंधी तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय,मंडळ अधिकारी यांच्या कडे चपला झिजवाव्या लागतात.महसूल विभागातील अनेक अधिकारी ,कर्मचारी सामान्य शेतकऱ्यांकडून जमीनीचे काम करून देण्यासाठी सर्रास पैशाची मागणी करतात किंवा पैसे घेतल्या शिवाय काम करत नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे. मुरबाड महसूल विभागातील अनेक तलाठी ,मंडळ अधिकारी यांना यापुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडून कारवाईचा बडगा उगारला असतानाही हे कर्मचारी, अधिकारी ऐकत नाहीत. दोनच दिवसापुर्वी म्हाडस सजा मधील तलाठी यांचे खाजगी मदतनीस याला दोन हजाराची लाच घेताना अटक झाली आहे.
हा बोकाळलेला भ्रष्टाचार थांबला पाहिजे तसेच प्रशासनात शिस्त आली पाहिजे त्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली आज तहसिलदार अभिजित देशमुख यांना लेखी निवेदन दिले आहे. यामध्ये अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयात शासकीय ओळखपत्र घालणे बंधनकारक करणे, मुख्यालयी वास्तव्यास राहणे व कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे अशा विविध मागण्या यावेळी महासंघाच्या वतिने करण्यात आल्या असून यावर तुमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून आपण निश्चित अमंलबजावणी करू असे आश्वासन तहसिलदार अभिजित देशमुख यांनी दिले.यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शंकर वडवले,जिल्हा कार्याध्यक्ष संतोष घुडे, प्रकाश विशे, निलेश बांगर, एकनाथ भोईर, सुरेश पष्टे, कल्पना पवार उपस्थित होते.
Post a Comment