BY,दि.07, POL, मुरबाड -
दि. ०५/०७/२०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुरबाड ज्यूनियर कॉलेज व प्राथमिक विभागाच्या वतीने मुरबाड शहरात आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी व पालखी सोहळा विठुरायाच्या नामघोषात अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा करून विठुरायाच्या नामघोषाने शहर भक्तीमय केले.या सोहळ्यास संस्थेचे सचिव श्री.किसन चौधरी सर, संचालक श्री. भास्कर खंडागळे, प्राचार्य श्री. राकेश पाडवी सर, सी.ई.ओ. श्री. निकम सर, उपप्राचार्य श्री. जयवंत कराळे सर,उप मुख्याध्यापक श्री.अनिल सोनवणे सर, पालक संपर्क अधिकारी श्री. जाधव सर,श्री.फणसे सर,श्री.प्रा.धोंडगे पाटील सर (संत तुकाराम महाराज वेशभूषा ) गायक राजू गोडांबे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या ग्रंथदिंडी व पालखी सोहळ्याचे स्वागत विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टच्या वतीने श्री.हरीशजी पुरोहित व श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री दिलीप भाऊ चोणकर यांनी केले. सर्वांना प्रसाद व नाश्ता दिला.
Post a Comment