(दि.13,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड येथील
सारिका हॉटेल जवळील मैदानात श्री.दर्शन सुनील शेटे आयोजित समन्वयक शिवशक्ती मुरबाड
तालुका यांचेवतीने भव्यदिव्य शिवशक्ती चषक 2024 चे मंगळवार दि.13/02/2024
ते रविवार 18/02/2024 या दरम्यान आयोजन
करण्यात आले आहे.यामध्ये सहा विजयी संघाचे विजयी म्हणून क्रमांक काढण्यात येणार
असून रक्कम पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.सदर शिवशक्ती चषकाचे उद्घाटन नवी
मुंबर्इ भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.संदीपजी गणेशजी नार्इक साहेब यांच्या प्रमुख
उपस्थितीत तसेच त्यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहेत.या चषकाचे व्यवस्थापक
निर्मला गु्रप असून या प्रथम वर्षाच्या चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज करिता कुलर व चषक,बेस्ट बॉलर करिता शूज व चषक,बेस्ट बॅट्समन करिता बॅट
व चषक,प्रत्येक सामन्याकरिता सामनावीर व चषक अशा
पारितोषिकाचा समावेश करण्यात आलेला आहे.सदर चषकम स्पर्धेमध्ये नियम व अटींचा
समावेश असून प्रवेश फी मात्र 10 हजार ठेवण्यात आलेले
आहे.प्रथम पारितोषिक 1 लाख व चषक,दुसरे
पारितोषिक 50 हजार व चषक यांसह इतर 4 पारितोषिक
व चषक विजयी संघाकरिता असून बक्षीस वितरण युवा नेतृत्व संकल्पजी सजिवजी नार्इक
यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात येणार असल्याचे श्री.दर्शन सुनील शेटे यांनी
आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.
Post a Comment