(दि.13,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड
शहराबरोबर तालुक्याच्या विकासाला ज्यांचा नेहमी हातभार लाभला,ज्यांनी
गोरगरिब महिला भगिनींना मदतीचा हात दिला,ज्यांनी महिलांना
सक्षमीकरणाकडे नेण्याकरिता त्यांच्याच पातळीवर जाऊन सन्मानाचे व्यासपिठ निर्माण
करून दिले अशा मुरबाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्षा सौ.मानसी मनोज देसले यांचे नाव
सदैव चर्चेत राहिले आहे.सौ.देसले तार्इ यांचे पती श्री.मनोज रमेश देसले यांची
खंबीर साथ ही ताईंना मिळत असल्याने त्यांच्या कार्यशैलीला जनसामान्यांनी पसंती
दाखविली आहे.मुरबाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्षा सौ.मानसी मनोज देसले यांनी दोन
वेळा नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून पदाची धुरा सांभाळली आहे.गेले
दोन वेळा महिला बालकल्याण सभापती असताना मुरबाड शहरातील विधवा निराधार मातांच्या
मुलींच्या विवाहाकरिता ११ हजाराचे अर्थसहाय्य,मुरबाड शहरातील
मुलींना MSCIT प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, अंगणवाडी साहित्य, तसेच आता मुरबाड शहरातील मुलींना
महिलांना कराटे तसेच योगा चे प्रशिक्षण देण्यासारखे अत्यंत स्तुत्य निर्णय
सौ.मानसी मनोज देसले यांनी घेतलेले आहेत तसेच आपल्या प्रभागात स्व:खर्चात विधवा
निराधार महिलांना शिलाई मशीन, कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी
आपल्या वॉर्ड मधील लांबाची वाडी येथील सर्वच आदिवासी कुटुंबांना भाजीपाला बियाणे,
खते, त्यासाठी लागणारे सर्व साधन स्व:खर्चाने
वाटप केले आहे त्यामुळे ह्या शहरात अश्या प्रकारे निर्णय क्षमता असणाऱ्या पहिल्या
नगरसेविका ठरल्या आहेत.त्यांच्या याच कार्याची दखल ही घेण्यात आल्याने ताईंना
पुन्हा तिसर्यांदा या पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने महिला म्हणून
नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्राच्या इतिहासात कर्तव्यशील महिला म्हणून महिला व
बालकल्याण समिती सभापती पदाची हॅट्रिक मारली आहे.धडाडीचे,विकासाचे
महामेरू महाराष्ट्राचे लाडके आमदार किसनराव कथोरे यांच्या अतिशय जवळचे देसले
परिवार राहिले आहे.सौ.देसले तार्इ यांचे पती श्री.मनोज रमेश देसले यांच्या
डोक्यावर आशिर्वाद राहिले असून समाजसेवक तथा देवा ग्रुप फाऊंडेशनचे ठाणे
जिल्हाध्यक्ष मनोज देसले यांच्यावर शाब्बासकीची थाप सदैव आमदार किसनराव कथोरे
यांनी मारली आहे.याच आशिर्वादाचा चमत्कार साक्षात्कारामध्ये आज झाल्याने सार्थ,निवडीचा सार्थ अभिमान म्हणून मुरबाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्षा सौ.मानसी
मनोज देसले यांना सलग तिसर्यांदा महिला व बालकल्याण समिती सभापती पदी आज निवड
झाल्याने आमदार किसनराव कथोरे यांचे आभार मानण्यात आले आहे.महिला व बालकल्याण
समिती सभापती पदी तिसर्यांदा उपनगराध्यक्षा सौ.मानसी मनोज देसले यांनी निवड
झाल्याने सर्वत्र स्तरातुन ताईंवर अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.
Post a Comment