(दि.11,POL -कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड तालुक्यातील
फेमस असलेले फोटोग्राफर श्री.कैलास मनोरे हे गावदेवी मातामंदीर येथे राहत
असून वादळी वार्यासह महातांडव
पाऊसाने थैमान घातला असता काही कालावधीतच होतचं नव्हतं झालं.संपुर्ण
मुरबाड शहरासह गाव खेडे पाडयात या वादळी वारे वीजेने महातांडवाचा खेळ केला.या खेळात अनेकांचे नुकसान झाले त्याकरिता सर्व विभागाचे अधिकारी यांनी पाहणी
दौराही केला परंतु महारूद्रावताराने थैमान घतालेल्या या पाऊस वादळी वाराने प्रकाशमयाला
अंधारमय केलयं.या फटक्यात झाडाची पडती झाली ती पडती विद्दयुत
पोल,तारावर झाल्याने सर्व तारा खाली कोसळल्या तर काही पोल वाकले
गेले.यामध्ये 3 ते 4 दिवस लाईट नसल्याने पिण्याचे पाणीचे वांदे झाले असून अनेकांचे नुकसान झाले आहे.पंचनामे जरी झाले असतील युध्द पातळीवर लाईटमन तथा वायरमन यांनी आपली शक्तीपणाला
लावून जलदगतीने कार्यतत्परवर रात्रंदिवस लाईट सुरळीत चालू होण्याकरिता आपले प्रयत्न
चालुच ठेवले.हळू हळू काही ठिकाणी लाईटचा प्रकाशमय घरात पोहोचला
परंतु काही ठिकाणी लाईटचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने यासंदर्भात
सदर ऐरियामध्ये लाईट आज 3 ते 4 दिवस नसल्याने
फेमस असलेले फोटोग्राफर श्री.कैलास मनोरे यांनी ऑनलाईन तक्रार
केली असता चक्क एमएसएबी ऑनलाईन विभागाने तुमचे 172 रू चे बील
बाकी असल्याने तुमची तक्रार घेऊ शकत नसल्याचे उत्तर दिल्याने यावर ग्राहक असलेले फोटोग्राफर
श्री.कैलास मनोरे यांनी आपल्या अंगावर कोणतेच बील थकीत नसून चालु
बील भरण्याची तारिख असून मी कोणतेच बील थकीत ठेवत नसल्याचे सांगत सदर लाईट नसल्याची
केवळ तक्रार असून हा प्रश्न माझ्या एकटयाच घराचा नसून तो संपुर्ण
एरियाचा असल्याने माणूसकीच्या दृष्टिने केले असल्याचे उध्दिष्टाने केले असल्याचे आमच्याशी
बोलतांना सांगितले.परंतु एमएसएबी ऑनलाईन तक्रार केंद्र नेमकी
कशासाठी आहे ? पैसे वसुलीसाठी की ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण
करण्यासाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक म्हणून विचारले असून
लाईट आल्यानंतर काही जण स्वतःचे पुढारपणा करिता नंतर पुढे येतील परंतु आता ऐरियासमवेत
घरात लाईट नसल्याने हा अंधारमय दूर केव्हा आणि कोण करेल अस प्रश्न फेमस असलेले फोटोग्राफर श्री.कैलास मनोरे यांनी केला
आहे.ऑनलाईन तक्रार केंद्रात तक्रार नोंदविण्यास गेल्यास थकीत
बीलाचे कारण देत असल्याने नेमकी हे केंद्र वसुलीचे काम पाहतंय का असा संताप जनक सवाल
करून लाईट न आल्यास आम्ही सर्व जनता रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडो असा इशारा
दिला आहे.
Post a Comment