BIG BREAKING NEWS...

ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे आयुष विभागामार्फत जागतिक योग दिन साजरा...

 

दि,24,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

दिनांक 21/06/25 रोजी ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे आयुष विभागामार्फत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला यवेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तसेच लहान मुले,गरोदर स्त्रिया व वयोवृध्द व्यक्ती अशा वेगवेगळया वयोगटातील व्यक्तींना योगाचे महत्त्व सांगितले व वेगवेगळी योगासने करून घेण्यात आली तसेच युथ वयोगटातील मुलामुलींकडून "एक पेड मा के लिये" असे घोषणा देत वृक्षारोपण केले तेथे त्यांना औषधी वनस्पतींचे उपयोग व योगाचे महत्त्व सांगितले.इच्छुक तरुणतरुणींसाठी सूर्यनमस्कार व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

अशा रीतीने ग्रामीण रुग्णालयात सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने योग दिन आनंदात साजरा झाला.अचानक ठरलेला योग दिनाचा हा कार्यक्रम डॉ.स्वप्नील वाकचौरे,डॉ.अनिल पटेल,जयश्री चौधरी सिस्टर, स्वप्नाली बांगर सिस्टर,गोपाळ बोभाटे,राहुल कारे,चेतन उघडे यांच्या मदतीने अतिशय उत्तमरीत्या कमी वेळात पार पाडता आला त्यामुळे आयुष् विभागातर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post