(दि.12,POL -कुणाल शेलार,मुरबाड)
विद्दयार्थी
घडला अन प्रगती झाली हे आपण जाणतो व पाहतो.याच शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची मेहनत
म्हणजे विद्दयार्थ्याचे उज्ज्वल भविष्य.याच शिक्षण क्षेत्रात गरिब गरजू
विद्दयार्थ्यांसाठी शासनानी विविध योजना आणल्या असून या कल्याणकारी योजनेतून विद्दयार्थ्यांना
आर्थिक मदतीचा हात मिळत आहे.मुरबाड विधानसभा मतदार संघातील पहिलेच्या जिल्हापरिषद
शाळा आणि आत्ताच्या जिल्हापरिषद शाळा यामध्ये विकासात्मक बदल झालेला
आहे.शिक्षकांची कमतरता सोडविण्यासाठी आमदार किसनराव कथोरे यांनी सदैव पुढाकार
घेतला आहे.
सुसज्ज
शाळा,महाविद्दयालयात उच्च शिक्षणाबरोबर अति दुर्बल घटकांतील गरिबीची परिस्थिती
असताना शिक्षणाची गोडी असलेल्या विद्दयार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळवून
देण्यात आणि महत्वपूर्ण मदतीचा हात देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा ठरला आहे.उत्तम
शिक्षण आज विद्दयार्थ्यांना मिळावे व आपल्या मातीचे नावलौकिक व्हावे याकरिता
नेहमीच अग्रेसर असलेले आमदार किसनराव कथोरे यांची धडपड सदैव चर्चेतच राहिली
आहे.समाजसेवेच्या वसात बसलेले आमदार श्री.कथोरे यांनी सर्वच क्षेत्रात बाजी मारली
असल्याने असा नेता पुन्हा होणे नाही अशा प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.मागील काही
वर्षापुर्वी शिक्षक मिळत नव्हता,विद्दयार्थी दांडी मारायचा
परंतु बदल घडला अन आज शिक्षण क्षेत्रात विद्दयार्थ्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.
आज
शिक्षणात झालेला बदल विकासाचे वादळ असलेले आमदार श्री.कथोरे यांच्या मुळे झाले
असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे.आमदर श्री.कथोरे यांनी शाळा,महाविद्दयालय येथील विद्दयार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून
घेतल्या असता त्या समस्याचे जागेवरच निराकरण करण्यात आले.
पहिले
मेरीट लिस्ट जरी लागली असली तरी अंतर्गत सेटलमेंट होत होते,डोनेशनचा कारभार सुरू होता,खरा गरिब विद्दयार्थी
मागे राहायचा,नाजूक परिस्थिती अभावी शिक्षण घेणं शक्य नसायचं
परंतु कधी ना कधी सुर्य अंधाराला झाकूनच टाकतो त्याच पध्दतीने आमदार श्री.कथोरे
यांच्या कालावधीत गरिब श्रीमंत घरातील विद्दयार्थी समानतेने आज ताट मानेने शिक्षण
घेतांना दिसले असून परिक्षेतुन भरमसाठ टक्केवारी बोर्डात सुवर्ण अक्षरात इतिहास
म्हणून शेरा कोरला आहे.याच शिक्षण क्षेत्रात झालेला बदल हा चांगल्या विचाराने आणि
प्रामाणिकपणाने झाला असल्यानेच चांगल्या दर्जाचे शिक्षण विद्दयार्थ्यांचे जीवन
बदलण्यात यशस्वी ठरेल आणि या यशस्वी वाटचालीस आमदार किसनराव कथोरे यांचे योगदान
अमुल्य असणारच यात शंका नाही.
Post a Comment