दि,27,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड शहरातील न्यू इंग्लिश स्कूल तसेच मुरबाड नगरपंचायतीच्या खाली मातानगर रहदारी रस्त्याच्यालगत असणार्या मन्नुभाईच्या भारत वाईन शॉपवर काल नवनिर्वार्चित राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी यांनी कर्मचार्यांसमवेत चौकशी धाड टाकली आहे.या दरम्यान पत्रकार यांनी केलेल्या चौकशीची माहिती घेण्यासाठी गेले असता आम्हाला पत्रकारांना बाईट न देण्याचे कमिश्नर यांचे परिपत्रक असल्याचे सांगून विचारलेल्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे न देता चेहरा लपवित उडवाउडवीची उत्तरे देत तेथून पळ काढला.या चौकशी दरम्यान राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र परिधान न केल्याने हे अधिकारी नविन चेहर्यांचे असल्याने हे अधिकारी खरे की खोटे असा संशय येत असून याकडे मुख्यमंत्री यांनी लक्ष वेधून सदर भारत वॉईन शॉपच्या मालकाच्या खुर्चित बसून कोणती चौकशी केली यामध्ये किती अधिकारी सामील होते याचे दुकानातील कैद असलेल्या सिसिटिव्ही फुटेज घेऊन पत्रकारांना खुलासा करावा अशी मागणी होत आहे.
यासंदर्भात ज्यावेळी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आले तेव्हा नविन भरून आलेला गाडीतील दारूचा साठा दुकानासमोर होता त्या गाडीकडे लक्ष न वेधता ती गाडी गायब करण्यात आली असता त्या गाडीतील साठयाची चौकशी झालेली नाही.चौकशी दरम्यान आकडयाचा गुढ कायमच राहिला आहे.या भारत वॉईन शॉपमध्ये बनावटी दारू विक्री केली जात असल्याचे बोलले जात असून टपर्यांमध्ये दारू विक्रीसाठी जाते हा प्रश्न समोर येत आहे.या दरम्यान मालक मन्नुभाई यांच्याशी संवाद साधले असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.अधिकारी आलेत त्यांच्या प्रश्नावलीदरम्यान मालक मन्नुभाई यांना घाम फुटले.नेमकी असं काय झालं की मन्नुभाई यांनो घाम फुटला.या 3 तासाच्या चौकशीत कोणता हिशोब लावला,काय हिशोब लावला,त्यांना काय सापडले,आकडयाचा कोणता मुद्दा यशस्वी ठरला याची चौकशी मुख्यमंत्री यांनी स्वतंत्र पथक नमून करावी अशी मागणी आता होत आहे.दरम्यान काही तास राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी चौकशी करत असताना उभे राहिलेले मुरबाडकर काय कारवाई होते याकडे लक्ष लावून होते परंतु काय चौकशी कारवाई झाली कि नाही याची माहिती अधिकारी यांनी पत्रकारांना सविस्तर न दिल्याने अनेक प्रश्न आज मुरबाडकरांना पडले आहे.
Post a Comment