दि,30,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
कल्याण कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या निवडणूकीत महायुतीने विजय मिळविला असून या निवडणूकीत कार्यसम्राट आमदार किसन
कथोरे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.यामध्ये 18 पैकी 16 जागांवर महायुतीच्या विजयाचा
गुलाल उडाला असून शेतकरी सेवा सोसायटी मतदार संघाचे 11 जागा,ग्रामपंचायत मतदार संघातील
4 पैकी 3 जागा,व्यापारी मतदार संघाच्या 2 जागापीैकी 1 जागा,हमाल/माथाडी मतदार संघ
1 जागा अशा 16 जागांवर विजय मिळवून महायुतीने आपल्या विजयाच्या रथेचा झेंडा फडकविला
आहे.या मध्ये तीन्ही पक्षाची ताकद होतीच परंतु आमदार किसन कथोरे यांची असलेली ग्रामीण
भागाची ताकद आणि असलेले मार्गदर्शन यामुळे हा विजय गरूडझेपावर विराजमान झाल्याचे विजयी
उमेदवारांकडून बोलले जात आहे.या पार पडलेल्या निवडणूकीत 16 जागांवर महायुती असून उर्वरित
2 जागांमध्ये ठाकरे गट व 1 अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे.निवडून आलेल्या महायुती
उमेदवारांचे सर्वस्वी अभिनंदन करण्यात येत असून कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत,ढोल वाजवून
फटाके फोडत उमेदवारांना खांदयावर उचलून विजयी उमेदवारांचे स्वागत यावेळी करण्यात आले.
Post a Comment