(दि.25,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड तालुक्यामध्ये
विविध तक्रारी प्रलंबित असताना मागे एका लहान बालकावर एका हॉस्पिटलमध्ये चूकीचे
उपचार केला असल्याची तक्रार एका नातेवार्इकानी केली होती त्यावेळी उपोषणाचा
इशाराही देऊन मुरबाड तहसिल कार्यालयाजवळ उपोषण छेडून कारवार्इची मागणी केली होती
त्या उपोषणाचे पडसात सर्व हॉस्पिटलच्या चौकशीत उतरल्याने कॉमन विषय म्हणून एएनएम
आणि जीएनएम मुद्दा चर्चेत आला होता.त्यानंतर सविस्तर माहिती तालुका आरोग्य अधिकारी
मुरबाड यांचे कार्यालयामार्फत चोखपणे सर्व हॉस्पिटलमधील काम करणार्यांची एएनएम
आणि जीएनएम माहिती अहवाल वरिष्ठांना सादर केली होती.त्यामध्ये काही हॉस्पिटलच्या
त्रुटी होत्या किंवा कसे याबाबत माहिती गोपनिय असल्याने ती माहिती प्रसिध्दी
माध्यमांपर्यत पोहोचली नाही व त्यानंतर वातावरण थंड झाले होते.परंतु आज पुन्हा
एएनएम आणि जीएनएम हा चर्चेचा मुद्दा बनला असून तालुका आरोग्य विभागामार्फत सर्व्हे
चौकशी सुरू झाल्याची माहिती कळून येत आहे.यामध्ये मागील चौकशी वरिष्ठांना गेली
असता पुन्हा चौकशी करण्याची का गरज पडली असा प्रश्न येथे उपस्थित राहत असून याचे
उत्तर अद्दयापही मिळालेले नाही.प्रसिध्दी माध्यमातून आलेल्या वृत्ताने बचावसत्राची
रणणिती ठरविली जात असल्याचे जाणकरांचे मत आहे तर हॉस्पिटलबरोबर गाव खेडेपाडयात
क्लिनीक चं काय ? या प्रश्नावरही लक्ष
केंद्रित होणं गरजेचे आहे कारण अनेक घडलेल्या घटना आणि बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
या गोष्टी आजही चिंता भेडसावत असल्याने नेमकी टार्गेट हॉस्पिटलच का असा प्रश्न
अनेक जण विचारत आहेत.बायोमेडिकल हा विषय जरी ज्वलंत नसला तरी त्याबाबत तालुका
स्तरावरील गावखेडेपाडयात हा मुद्दा गांभिर्याचा आहे.त्यातच आता एएनएम आणि जीएनएम
च्या चौकशीचा मुद्दा स्थानिक पातळीवर काम करणार्यावर घाला घातल्याचे समजल्यास
बेरोजगारावरही परिणाम होठ्ठ शकेल यात शंका नसून एएनएम आणि जीएनएम च्या
अनोंदणीकृतपणाच्या प्रश्नचिन्हाला दोषी नेमकी कोण ? शिक्षण
घेऊन त्यांचीच दिशाभूल झाली असल्यास त्याचा फटका स्थानिकांनाच का असा प्रश्न
येथिल नागरिक विचारत आहेत.काही ठिकाणी आमच्याकडे नोंदणीकृत होय नाही असा शेरा जरी
पडला असला तरी वास्तविकता वरिष्ठ पातळीवरून स्वतंत्र समिती गठित करून तपासणे
गरजेचे होर्इल तेव्हाच दूध का दूध आणि पाणी का पाणी ही म्हण सत्येत येण्यास
सुरूवात होर्इल.कोणाकडे अनोंदणीकृत व कोणाकडे नोंदणीकृत असल्यास एकदाच याबाबत
योग्य तो निर्णयही होणं महत्वाचे ठरेल.
एएनएम आणि जीएनएम नेमकी काय ? -
एएनएम आणि जीएनएम
म्हणजे शासकीय नियमानुसार हॉस्पिटलमध्ये कार्यरत नर्स स्टाफ कर्मचारी यांची
बारकौन्सिल येथे रितसर नोंदणी करणे गरजेचे आहे त्यानंतरच हॉस्पिटल असो वा क्लिनीक
येथे काम करता येर्इल,इंजेक्शन सुर्इ,सलार्इन लावता येर्इल व इतर हॉस्पिटलमधील कामे करता येतील.परंतु
अनोंदणीकृत असल्यास त्यांना इंजेक्शन सुर्इ,सलार्इन लावता
येणार नाही व इतर कामे करता येणार नाही अशी माहिती कळून येत आहे.
एएनएम आणि जीएनएम प्रशिक्षण घेतलेले स्थानिक विद्दयार्थी दोषी नाही तर
फसवणूक कुठून व कोणी केली -
मुरबाड तालुक्यात
एएनएम आणि जीएनएम अनेक ठिकाणी प्रशिक्षणक्षेत्र विभाग उदयास आले असून जेथे आपण
प्रशिक्षण घेत आहोत ते अधिकृत आहेत कि नाही व त्यानंतर आपली नोंदणी बारकौन्सिलकडे
करता येर्इल की नाही याची कल्पना ग्रामीण भागातील विद्दयार्थ्यांना नसल्याने
प्रशिक्षण प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करतात परंतु कालांतराने त्यांची नोंदणी ही
अधिकृतपणे न केल्याने त्यांना नियम व अधिकारी दोषी मानतात परंतु यामध्ये त्यांचा
कोणताही दोष नसल्याने ज्यांनी त्यांची फसवणूक केली या मुळावर वरिष्ठांनी चौकशी
करून संबंधितांवर कारवार्इ केली पाहिजे.
Post a Comment