BIG BREAKING NEWS...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळयाचे अनावरण सोहळा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

 

दि,19,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

बदलापूर येथे काल श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्‍वारूढ पुतळयाचे अनावरण सोहळा मोठया थाटामाटात आनंदोत्सवात महाराष्ट्राचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस तथा लाडक्या बहिणींचे देवाभाऊ यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत पार पडले.यावेळी महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय,मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्री.किसनराव कथोरे यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे शिवप्रतिमा देऊन सहर्ष स्वागत केले.याप्रसंगी आमदार श्री.कथोरे यांनी आमचे विचार मांडुन व्यासपिठावरून छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे यांचे पदस्पर्श पाऊल या बदलापूरच्या भूमीला लागल्याने हे बदलापूर पावन झाले असून आज या लोकार्पण सोहळयासह बाजुलाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे केले आहे त्यामुळे त्यांच्या चांगल्या विचाराने समन्वय व त्याचा लाभ माझ्या मतदार संघातील जनतेला मिळाल्याने ही स्थळ नतमस्तक होण्याचा मनापासून आज आनंद देत असून जे घडलं ते चांग्ल्या प्रकारे घडलं आणि यामुळे निश्‍चितच एक चांगल्या प्रकारे दिशा मिळाली आहे.त्याचबरोबर या व्यासपिठावरून आमदार श्री.कथोरे यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे बदलापूरला शिवकालीन परंपरा असल्याने शिवकालीन दर्जा मिळावा व शिवकालीन बदलापूर असे नामकरण करावे अशी मागणी केली यावेळी केली.

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीतुन अंबरनाथ येथून 1 वेळा व मुरबाड विधानसभा मतदार संघातुन 4 वेळा असे सलग 5 वेळा आमदार किसनराव कथोरे मोठया ताकदीने व बहुमताने निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्या असून त्यामध्ये आमदार किसनराव कथोरे यांना आजपर्यंत मंत्री केले गेले नाही अशी खदखद जनतेच्या मनात असून त्या खदखदीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर याच व्यासपिठावरून विरोधकांना मार्मिक शब्दाने उत्तर देऊन जनतेसमोर व लाडक्या बहिणींसमोर आमदार श्री.कथोरे यांना मंत्रीपदाचा हिरवा कंदिल दाखवला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संभाषणाची सुरूवात जय भवानी जय शिवाजी या घोषवाक्याने करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्‍वारूढ पुतळयाचे अनावरण सोहळयात आपले विचार प्रगट केले.बदलापूर शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केलेल्या मागण्यांवर त्यांनी निश्‍चित स्वरूपातच मान्य करून ते पुर्णत्वाकडे नेण्याचे आश्‍वासन दिले.या प्रसंगी लाडक्या बहिणी,जनता,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या यावेळी आमदार श्री.कथोरे यांना मंत्रीपद देण्याच्या आवाजावर आमदार श्री.कथोरे यांना मंत्रीपदाचा हिरवा कंदिल दाखवला असून त्यांच्या भाषणात आमदार किसन कथोरे हे मंञ्यापेक्षा कमी आहेत का,जे मंत्री करू शकत नाही ते श्री.कथोरे करतात,त्यांच्या पाठिशी प्रत्यक्ष मुख्यमंत्री आहेत त्यामुळे तेच मुख्यमंत्री आहेत चिंता करू नका,योग्य वेळी ते मंत्री होतील असे आश्‍वासनही देऊन मेट्रो प्रकल्पासह विकासात्मक कामे व इतर मागण्यां पुर्ण करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले आहे.या कार्यक्रमाप्रसंगी लाडक्या बहिणींकडून लाडका भाऊ देवा भाऊ यांचे भव्य सत्कार करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचे सत्कार बदलापूर येथे सर्व नगरसेवक,नगसेविका,पदाधिकारी यांच्यासह नवनिर्वाचित असलेले मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संतोष (बाबु)चौधरी,भाजपाचे नितीन मोहपे सर,ज्येष्ठ नेते उल्हासभाऊ बांगर तसेच अन्य मुरबाड,बदलापूर येथील कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

या व्यासपिठावर भिवंडी लोकसभा खासदार सुरेश(बाळयामामा) म्हात्रे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे,आमदार ज्ञानेश्‍वर म्हात्रे,आमदार कुमार आयलानी,ठाणे जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे,ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,मुख्याधिकारी मारूती गायवकवाड,गटनेते राजेंद्र घोरपडे,भाजपा ठाणेजिल्हाध्यक्ष श्री.डाके,टिडीसी बेँकेच संचालक राजेश पाटील,मा.नगराध्यक्ष नंदकिशोर (राम) पातकर,उद्दयोजक नरेश कथोरे,युवा उद्दयोजक मयुर ऐगडे यांसह अन्य मान्यवर तसेच या कार्यक्रमाला मुरबाड येथून भाजपा उपाध्यक्ष मुरबाड तालुका एकनाथ पोगेरे,अ‍ॅड.सचिन चौधरी,सौ.स्वराता सचिन चौधरी(मा.सभापती),सौ.मानसीता मनोज देसले,उद्दयोजक सुभाष कडव,नगरसेवक,नगरसेविका यांसह कार्यकर्ते,पदाधिकारी व हजारोच्या संख्येने लाडक्याबहिणी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे मंडप डेकोरेट व नियोजन श्री.उत्तम विशे व त्यांचे सहकार्य यांनी चांगल्या प्रकारे केले असून या कार्यक्रमाचे आभार संजय भोर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post