BIG BREAKING NEWS...

मोहिनी ज्ञानेश्वर पालवी 81.80 टक्के घेऊन गाठले गरूडझेप यश....

 

दि,13,POL, कुणाल शेलार,मुरबाड –

गरिबीची परिस्थिती आणि आ वडिलांच्या मेहनतीची जाण असलेली त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना जिद्द,चिकाटी,धाडसी शैली सोबत घेऊन मोहिनी ज्ञानेश्‍वर पालवी हि 10 बोर्डाच्या परिक्षेत बसली होती.अंधारात अभ्यास करून परिक्षेत उजेड निर्माण करून चक्क 81.80 टक्क्यांनी यश संपादीत केले.तिच्या या कौशल्याने सर्वांनी तिचे अभिनंदन केले आहे.यावेळीही मुलांच्या 10 बोर्डात यशाच्या टक्केवारीकडे पाहता यंदाचीही बाजी मुलींनी मारली असल्याने ठाणे जिल्हयातील कल्याण तालुक्यातील खडवली येथील राहणारी मोहिनी हिची आ मुक्ता पालवी व ज्ञानेश्‍वर पालवी हे अपार कष्ट करित असताना त्या कष्टाला आज खर्‍या अर्थाने गौरवशाली अभिमान मोहिनीने मिळवून दिला आहे.मोहिनी पालवी हिने यश संपादीत केल्याने तिचे पालवी,गोरले,भोर यांसह सर्व परिवाराकडुन,नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून तिचे सर्वत्र अभिमानस्पद अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post