BIG BREAKING NEWS...

कळमखांडे गावात श्री हनुमान मंदिर जिर्णोध्दार व मुर्तीची प्राणप्रतिष्ठा कळशारोहण सोहळयानिमित्त 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन...

 

दि,23,POL,कुणाल शेलार, मुरबाड -

मुरबाड तालुक्यातील कळमखांडे गावात बुधवार दि.26/11/2025 ते शुक्रवार दि.28/11/2025 तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित केले असून गुरूवर्य योगी फुलनाथजी बाबा (टाकेश्‍वर मठ) यांच्या कृपाआशिर्वादाने व ह.भ.प.बबन महाराज घोरड यांच्या मार्गदर्शनाखाली,पुरोहित विलास तात्या रत्नाकर(मुरबाड) व समस्त कळमखांडे ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री हनुमान मंदिर जिर्णोध्दार,मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम सोहळा मोठया थाटामाटात पार पडणार आहे.यामध्ये पहिल्या दिवशी बुधवार दि.26/11/2025 रोजी दु.2 वा.मुर्ती व कळसास गंगास्नान ग्रामप्रदक्षिणा व मंडळ प्रवेश व रात्री 9 ते 11 वा.ह.भ.प.राजु महाराज घावट (आळंदी) यांचे सुश्राव्य किर्तन सौजन्य किर्तन म्हणून श्री.भास्कर पांडुरंग बांगर (भुवनपाडा),ह.भ.प.अरूण घावट,भुषण कापडी (मृदंगसाथ) व सर्व गुणीजन कलाकार यांचे कार्यक्रम असून दुसर्‍या दिवशी गुरूवार दि.27/11/2025 रोजी सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत गणेश पुजन,पुण्याहवाचन,मातृकापुजन,मंडपप्रतिष्ठा,नांदीश्राध्द,अग्निस्थापना, नवग्रहपुजन, ब्रम्हादीमंडळपुजन,वास्तुमंडळपुजन,योगीनीपुजन,काळभैरव क्षेत्रपालपुजन,मुर्ती जलाधिवास,धान्याधिवास व होमहवन,सायं.6.30 वा.ते 7.30 पर्यंत सामुदायिक हरिपाठ,रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत ह.भ.प.वासुदेव महाराज पाटील (मांगरूल) यांचे सुश्राव्य किर्तन,किर्तन सौजन्य  कै.चिंधु विठु म्हारसे यांच्या स्मरणार्थ श्री.पंढरीनाथ चिंधु म्हारसे(काकडपाडा),ह.भ.प.विकास लाटे,भुषण कापडी(मृदुंग साथ) व सर्व कलाकार,तर तिसरे दिवशी गुरूवार दि.28/11/2025 रोजी सकाळी 8 वा.अवाहीत देवता पुजन,होमहवन,दु.12 वा.मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व योगी यशनाथ बाबा योगी नरेंद्रनाथ महाराज,योगी दर्शननाथ महाराज(टाकेश्‍वर मठ),योगी गोपीनाथ बाबा,संगमेश्‍वर मठ,योगी धनंजयदास महाराज,तुंगेश्‍वर मठ यांच्या हस्ते कळशारोहण व पुर्णाहुती,महाआरती,संतपुजन व नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता अशी रूपरेषा असून सदर मंदिर जिर्णोध्दार व मुर्तीची प्राणप्रतिष्ठा कळशारोहण सोहळयाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे व्यवस्थापक,कार्यवाहक व कळमखांडे गावाचे ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post