BIG BREAKING NEWS...

पत्रकार कुणाल शेलार यांच्यासह त्यांच्या धर्मपत्नीचा अपघात ; आमदार किसनराव कथोरे साहेब व जनतेचे आशीर्वाद असल्यानेच हे संकट टळले

दि.22,POL, मुरबाड -

आज सकाळी पत्रकार कुणाल शेलार व त्यांच्या धर्मपत्नी सौ.मयुरी कुणाल शेलार हे बदलापूर बिरवाडी मार्गे मुरबाड येथे येत असताना मोठी नदी पुलाच्या अलीकडे असलेल्या उतरणीच्या रोड लगत रिक्षाला धडक लागल्याने त्यांचा अपघात झाला.या अपघातात पत्रकार कुणाल शेलार यांना हाताला व बोटाला दुखापत झाली असून सौ.मयुरी शेलार यांच्या पायाला मुका मारची दुखापत झाली आहे. सदर रिक्षावाला हा प्रवासी यांना उतराणीच्या ठिकाणी अचानक उतरावीत होता व मागून पत्रकार श्री.शेलार यांची गाडी येत असताना रिक्षावाला याने मागे न पाहता रिक्षा वळविण्यास घेतली.सदर रिक्षा रिवस मध्ये येत असताना शेलार यांच्या गाडीला धडक बसली यामध्ये पत्रकार कुणाल शेलार व त्यांच्या धर्मपत्नी सौ.मयुरी शेलार यांना किरकोळ दुखापत झाली असून कोणतीही जीवितहानी झाली नसून आमदार किसनराव कथोरे साहेब व जनतेचे आशीर्वाद असल्यानेच हे संकट टळले.

Post a Comment

Previous Post Next Post