BIG BREAKING NEWS...

मुरबाड भाजपमय झालं; दोन कुणबी एकत्र...

 

दि,13,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

नुकताच झालेल्या मुरबाड विधानसभा निवडणूकीनंतर आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात असलेले उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी अखेर विकासाला मान्य करित आमदार किसन कथोरे यांच्या सोबतीने एकतर्फी विकास करण्याचा निर्धार करण्याचा निर्णय घेत आज मुंब येथे भाजपा पक्षात जाहिर प्रवेश केला त्यामुळे आता मुरबाड तालुका भाजपमय झाला आहे.येणार्‍या जिल्हा परिषद,पंचायत समिती,मुरबाड नगरपंचायत,ग्रामपंचायत निवडणूकीत किंगमेकर आमदार किसन कथोरे यांच्यासोबत गोटीरामभाऊ पवार यांचे सुपुत्र एकाच पक्षातून उमेदवार एकतर्फी निवडून आणतील असेच चित्र समोर उभे राहिले आहे.आज मुंब येथील भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष गोटीराम पवार यांनी '' देर आ परंतु दूरूस्ती हू '' माणून विकासाला पसंती देत भाजपा पक्षात प्रवेश केला त्याचबरोबर सुभाष पवार यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनीही भाजपात प्रवेश केल्याने नाराजी दूर करून '' दोन कुणबी योध्दा एकत्र आले '' असल्याने विरोधकांनीही सुभाष पवार यांच्यावर जहरी टिका करित त्यांना टोला लगावला आहे.

आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात सुभाष पवार आमदारकीला उमेदवार म्हणून होते परंतु आमदार किसन कथोरे यांची ताकद काय आहे ते त्यांनी झालेल्या निवडणूकीत दाखवून दिली असून आता सर्वत्र भाजपाचे कमळ उमलत असल्याचे दिसल्याने अखेर कुणबी विरूध्द कुणबी यांचा विरोध कशासाठी या दृष्टिकोणातून दोन कुणबी एकत्र आल्याने सर्व स्तरातुन आनंदाचा वर्षाव होत आहे.

कालपर्यंत फुट पाडणार्‍यांनी आज एकत्र आल्याचे बघितल्यावर आमदार किसन कथोरे यांच्या ताकदीची त्यांना जाणीव झाली असावी अशी चर्चा होत असताना स्व.शांतारामभाऊ घोलप यांच्या विचाराने दोन कुणबी आता एकत्र आल्याने मुरबाड तालुका आता विकासाच्या धुरा गतीमान होल यात शंका नाही.येणार्‍या निवडणूकीत आमदार किसन कथोरे अधिक सुभाष पवार असे गणित जुळविल्यावर मुरबाड नगरपंचायत,पंचायत समिती,ग्रामपंचायती या भाजपाच्याच खात्यात जमा होतील अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

बाणनंतर काटा आणि त्याच काटयावर कमळ फुलल्याने मुरबाडच्या राजकारणात एक नवशक्ति ताकद आमदार किसन कथोरे व सुभाष पवार यांच्या एकीने समोर येणार आहे.आमदार किसन कथोरे यांचा चष्मा खाली गेला त्यानंतर अनेकांना त्यांची ताकद कळाली असून त्यांच्या खेळीने राजकारणात नवा बॉम्ब पडला असल्याने भलेभल्यांनी कालपर्यंत विरोधात्मक भूमिका दर्शविल्याने आता आमदार किसन कथोरे यांच्यापुढे चेहरा घेऊन जातांना दिसतील हे नाकारले जाऊ शकणार नाही.आमदार श्री.कथोरे यांनी केलेला विकास हे सुभाष पवार यांनी मान्य केले असून त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यामुळे कभी खुशी कभी गम देखील असू शकतील त्यामुळे जुन्यांना संधी मिळेल कि नव्यांना संधी मिळेल याचं कोड सध्या तरी सुटेनासे आहे.सुभाष पवारांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीला सोडचिठ्ठी देऊन भाजता आल्याने भाजपाची ताकद सध्यातरी वाढली आहे हे नाकारता येणार नाही.

आमदार किसन कथोरे यांनी देखील सुभाष पवार यांना प्रवेशासाठी नकार न दिल्याने त्यांनी स्व.शांताराम भाऊ घोलप यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कुणबी बाणा एकत्र येणे गरजेचे आहे असेही मान्य केले असेल.भाजपात येणार्‍यांचे मी नेहमी स्वागतच केले आहे त्यामुळे कालचे विरोधक उद्दयाचे मित्र होऊ शकतात त्यातच जनतेची कामे,विकासाची गती हेच मुख्य उद्दिष्ट आमदार श्री.कथोरे यांच्यापुढे सदैव राहिल्याने सुभाष पवार भविष्यात याच विकासाच्या गतीचे दावेदार असतील यात कोणताही संभ्रम नसेल अशी चर्चा होत असून आज झालेल्या पक्ष प्रवेशात एक मात्र निश्‍चित ज्यांनी तोडण्याचं प्रयत्न केलं त्यांनी कुणबी कुणबी एकत्र आणून दाखविले त्यामुळे आता कुणब्यांची ताकद शंभरपटीने वाढली आहे.या जाहिर पक्षप्रवेसात सुभाष गोटीराम पवार यांच्यासह रामभाऊ दळवी,प्रकाश पवार,धनाजी दळवी,बाळकृष्ण चौधरी,गुरूनाथ झुंझारराव,रेखाता इसामे,सागर कडव,अनिल देसले,प्राजक्ता मोहन भावार्थे बळीराम आगिवले,अशोक पाटोळे,श्रीकांत कोर,श्रीकांत पवार,लक्ष्मण सरनिंगे,सुनिल घागस अशोक पठारे बीएम पवार संतोष देशमुख अजय चौधरी मंगल केणे,सुनिल बांगर,विपुल कापडी जयराम देसले,जगन आगिवले,चंद्रकांत गायकर,चेतन घुडे,यांच्यासह शेकडो सहकारी पदाधिकारी यांनी यावेळी भाजपात जाहिर पक्ष केला.यावेळी मुरबाड पूर्व पश्‍चिम मंडळाचे दिपक पवार,जितेंद्र भावार्थे यांच्यासह मोठया संख्येने भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

  --------------------------------------------------

मधल्या काळात भाजपाच्या विरोधात म्हणजेच आदरणीय आमदार श्री.कथोरे साहेब यांच्या विरोधात मी आमदारकीची निवडणूक लढविली परंतु  शेवटी आपण विचार केला की विकासकामात अजून गतीमान करायची असतील आपल्या विकास कामे करायची असतील तर आपण भाजप बरोबर गेलं पाहिजे.मला भाजपामध्ये प्रवेश दिला त्यामुळ मी प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब,आमदार श्री.कथोरे साहेब,श्री.पाटील साहेब आपले मी आभार मानतो.- सुभाष गोटीराम पवार

 --------------------------------------------------

आज सुभाष पवार यांचे भाजपा पक्षात प्रवेश होत असून प्रथम देशासाठी एकसंघ झालो पाहिजे,नंतर पक्षासाठी एक झालो पाहिजे आणि ती सुरूवात माझ्या मुरबाड मधून होत आहे त्यामुळे मी मनापासून सुभाष पवार व त्यांच्या सर्व सहकारी यांचे अभिनंदन करतो.ठाणे जिल्हयात आता भाजपाची ताकद लावणार असून सुभाष पवार माझ्या संपर्कात आहेत.मुरबाडच्या बाहेर ही आपण लक्ष वेधले पाहिजे.आम्ही घडलो ते केवळ स्व.घोलप साहेब,श्री.पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि नक्कीच तो विचार आम्हाला कधीच विसरता येणार नाही.आमच्यावर चांगल्या विचारांचे संस्कार आहेत त्यामुळे ते संस्कार भारतीय जनता पार्टी मध्ये आल्यानंतर राज्याचे पारदर्शक नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांच्या दृष्टिकोणातून महत्वाचा आहे.जर विकास करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस शिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्राला देवेंद्रजींची गरज आहे त्यामुळे आपण तुम्ही एक झालो पाहिजे.- आमदार श्री.किसन कथोरे


(आमची बातमी आमच्या सहमतीशिवाय जशाच तशी कॉपी केल्यास कायदेशीर कारवा करण्यात येल कृपया याची नोंद घ्यावी.)

 

Post a Comment

Previous Post Next Post