दि,25,POL,कुणाल शेलार, मुरबाड -
प्रत्येक शैर्यतीत जिंकणारा
माणूसकी जिव्हाळा लावणारा मुरबाड तालुक्यातील कळमखांडे गावातील पैंजण नावाचा नावलौकिक
बैलाचा 2 दिवसापूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यु झाला असल्याने ग्रामस्थांनी
तीव्र भावना व्यक्त केल्या असून उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी तत्परता दाखविली नाही.प्राण्यांच्या
अनेक डॉक्टरांशी ग्रामस्थांनी पैंजणला वाचविण्यासाठी फोन केले परंतु तुम्ही त्याच्याकडे
गेले याच्याकडे गेले या रोषापाई अखेर एका प्राण्याचा जीव गेला असून डॉक्टर त्या पैंजणच्या
मृत्युला कारणीभूत असल्याचे गावकर्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.पैंजण बैल याला कोणता
आजार होता तसेच त्याला काय झाले याकरिता प्राण्यांचे डॉक्टरच सांगू शकतात परंतु हलगर्जीपणा
दर्शविल्याच्या नागरिकांनी आपल्या भावनुक भावना व्यक्त करून वेळेत उपचार झाले असते
तर आज पैंजण मृत्युमुखी पडला नसता.त्यातच एका डॉक्टराला पैजणच्या आजाराची अवस्था पाहून
त्याच्यावर अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न करून त्याच्यावर औषध उपचार केले परंतु पैंजण नी मात्र आपल्या मालकाच्या समोरच श्वास सोडल्याने मालक दत्तात्रय कापडी यांच्या डोळयातील
आश्रू थांबवता आले नाही.त्यामुळे मालक दत्तात्रय कापडी यांनी ही वेळ कोणत्या माझ्या
सारख्या दुसर्या मालकावर येऊ नये म्हणून प्राणी पशू डॉक्टरांना वरिष्ठ अधिकारी यांनी
अशा घटना पुन्हा घडु नये म्हणून तात्काळ सुचना आदेश द्दयावेत अशी मागणी जिल्हाधिकारी
ठाणे यांच्याकडे आमच्या माध्यमातून केली आहे.मालक दत्तात्रय कापडी यांच्यासह कुटूंब
व कळमखांडे ग्रामस्थांचे पैंजण बैल हा शान होता परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पैंजण हा सर्वांपासून लांब गेला असल्याच्या प्रतिक्रिया जोमाने उमटू लागल्या आहे.


Post a Comment