BIG BREAKING NEWS...

मुंबईचे संचालक - 1 डॉ.नितीन अंबाडेकर यांची मुरबाड ग्रामीण रूग्णालयाला भेट...

 

दि,08,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड सारख्या ग्रामीण भागात काल आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य मुंबईचे संचालक-1डॉ.नितीन अंबाडेकर यांनी पाहणी द्वौरा केला.या भेटी दरम्यान ठाणे जिल्हयातील सर्वच ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमीक आरोग्य केंद्राला अप्रत्यक्षपणे भेट दिली.ग्रामीण रूग्णालयाच्या भेटी दरम्यान श्री.डॉ.नितीन अंबाडेकर यांनी उपलब्ध सुविधा व लागणार्‍या सुविधांचा आढावा घेतला.ग्रामीण रूग्णालय,प्राथमीक आरोग्य केंद्रात नागरिकांना सर्वच प्रकाराच्या सुविधा उपलब्ध व्हावेत हेच शासनाचे धोरण असून नागरिक कोणत्याच सुविधांपासून वंचित राहू नये म्हणून ही भेट नागरिकांचे विश्‍वास संपादन करणारी ठरली आहे.

या पाहणीद्वौरात विभाग महाराष्ट्र राज्याचे मुंबईचे संचालक-1डॉ.नितीन अंबाडेकर यांच्यासमवेत ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार,ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे,कुष्ठरोग ठाणेचे सहाय्यक संचालक मनिष रेंघे,आरबीएसके चे प्रमुख श्री.विनोद जोशी सर व अन्य अधिकारी यांचा समावेश होता.ग्रामीण भागाचा होणार्‍या विकासाबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे पाहणी द्वौरा सांगून जात आहे.

मुरबाड तालुक्यातील टोकावडे ग्रामीण रूग्णालयाचे पाहणी करून मुंबईचे संचालक-1 डॉ.नितीन अंबाडेकर यांनी नंतर मुरबाड ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांचे वैद्दयकिय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी त्यांचे स्वागत केले.मुरबाड तालुक्याचे सुसज्ज उपलब्ध सुविधा असणारे मुरबाड ग्रामीण रूग्णालयाच्या भेटी दरम्यान डायलेसिस विभाग,जनरल कक्ष,रक्त तपासणी विभाग,एक्सरे विभाग,अपघात विभाग,प्रसुती कक्ष,मेमोग्राफी विभाग,डॉक्टरांची ओपीडी विभाग,औषध साठा विभाग,कुष्ठरोग व क्षयरोग विभाग यांसह ग्रामीण रूग्णालयाच्या आवारातील झालेल्या विविध विकासकामांचा संचालकांनी आढावा घेतला.

स्टार्फ नर्सपासून डॉक्टर,अधिकारी,कर्मचारी यांच्याकडून माहिती प्राप्त करून घेतली असता सदर माहिती तंतोतंत जागेवरच उपलब्ध करून दिली असता मुंबईचे संचालक-1 डॉ.नितीन अंबाडेकर यांनी चांगल्या प्रकारे समाधान व्यक्त केले.मुरबाड ग्रामीण रूग्णालय सुसज्ज असून लागणार्‍या यंत्र सामुग्री व रिक्त पदे यांवर संचालकांनी लक्ष केंद्रित करून ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकिय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली व नागरिकांना अवश्यक सुविधा अधिक प्रमाणात मिळावे म्हणून संचालक-1 डॉ.नितीन अंबाडेकर यांनी तात्काळ आपली नायक भूमिका दर्शविली.यावेळी मुंबईचे संचालक-1 डॉ.नितीन अंबाडेकर यांचे राज्याच्या सर्वच शासकीय रूग्णालयांवर बारकाने किती लक्ष आहे हे मुरबाड तालुक्यातील भेटी दरम्यान दिसून आले.

यावेळी संचालक-1 डॉ.नितीन अंबाडेकर,ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार,ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे,कुष्ठरोग ठाणेचे सहाय्यक संचालक मनिष रेंघे,आरबीएसके चे प्रमुख श्री विनोद जोशी सर,मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकिय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे,क्लार्क संतोष सुरवसे,योगेश घोडविंदे,निकीता कोकडे,सिमा भोंडविले,अधिपरिचारिका जयश्री चौधरी,शिला गोवळकर,दिपाली जामदार,शकुंतला काळे,एक्सरे विभागाचे सागर राऊते,रक्त तपासणी विभागाचे निलेश लोंडे,अजय वेखंडे,औषध निर्माण अधिकारी गोपाळ बोभाटे,डॉ.सुतार सर,डॉ.स्वप्निल वाकचौरे,डॉ.अनिल पटेल,डॉ.सुनिल विश्‍वकर्मा,डॉ.अनिल विश्‍वकर्मा,डॉ.जाज शेख,डॉ.जयवंती ठमके मॅडम,आरबीएसके विभागाचे डॉक्टर्स,कुष्ठरोग विभागाचे,क्षयरोग रोग विभागाचे संतोष देसा,योगेश साळूंखे,102 व 108 अ‍ॅम्ब्युलन्सचे योध्दा तानाजी भोर,भाऊ हरड,दादू हिंदुराव यांसह ग्रामीण रूग्णायालाचे सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होते.या पाहणी द्वौरानंतर आलेल्या सर्व टिम अधिकारी यांनी गोवेली येथील ग्रामीण रूग्णालयाकडे भेटीसाठी प्रस्थान केले.

 

Post a Comment

Previous Post Next Post