BIG BREAKING NEWS...

नगरसेविका सौ.मधुरा मोहन सासे यांची बांधकाम समिती सभापती निवड...

 

(दि.14,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

ज्यांची सदैव कार्यशैली तुफान राहिली आहे व ज्यांनी वार्डाबरोबर विविध तळागळातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना पारदर्शकतेने न्याय मिळवून देण्याचा कायम प्रयत्न करून प्रयत्नशीलता दाखविली आहे अशा मुरबाड नगरपंचायत वार्ड क्र.15 च्या नगरसेविका सौ.मधुरा मोहन सासे यांची बांधकाम समिती सभापती पदी निवड करण्यात आली आहे,यावेळी अधिकृत घोषणा करतांना पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मुरबाड श्री.रामदास दौंड यांनी काम पाहिले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवक तसेच गोरगरिबांचे मदतकर्ते म्हणून ओळख राहिली आहे असे सौ.मधुरा मोहन सासे यांचे पती माजी नगरसेवक तथा नगराध्यक्ष श्री.मोहन सासे यांनी सदैव जनहितार्थ भूमिकेतून जनसामान्यांची सेवा करून माणूसकीची झरी जपली आहे.श्री.मोहन सासे यांची समाजसेवेच्या कार्याची ख्याती तमाम जनतेला ज्ञात आहे त्यांनी दिलेले शब्द व केलेला वायदा कधी खाली पडू दिला नाही त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वचनात जिद्दीची धमक ही दिसली आहे.अतिशय मोठया पराकष्टात सदैव महाराष्ट्राचे लाडके आमदार किसनराव कथोरे यांचे आशिर्वाद प्राप्त झाले आहे.आमदार किसनराव कथोरे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून समाजसेवक तथा माजी नगराध्यक्ष त्याचबरोबर उद्दयोगपती मोहन सासे आहेत हे मागील एका कार्यक्रमाचे औचित्य साधत त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या.हाच समाजसेवी वारसा श्री.मोहन सासे यांची पत्नी सौ.मधुरा मोहन सासे यांनी हाती घेऊन पुढे चालविले आहे.याच समाजसेवी वारसा म्हणून ओळख असलेल्या सौ.मधुरा मोहन सासे यांची मुरबाड नगरपंचायतीच्या बांधकाम समिती सभापती म्हणून अधिकृत घोषणा मुरबाड नगरपंचायत प्रशासनच्या वतीने केली आहे.प्रत्येक सुख दुखःत सौ.सासे तार्इ यांच्या पाठिशी श्री.मोहन सासे यांची खंबीर पाठिराखे म्हणून साथ मिळाली असून तमाम जनतेच्या नजरेत व मनात त्यांच्या कर्तृत्व कार्यशैलीची छबी राहिली आहे.याच जनतेच्या विविध प्रश्नाचे आता निरासरण ताईंच्या माध्यमातून होतील असे येथिल नागरिकांनी आपल्या मनातील विचारतेचे भावना व्यक्त केल्या आहेत.सौ.मधुरा मोहन सासे यांच्या माध्यमातून विकासाला नवी चालना मिळणार असून सर्वसामान्य जनतेला मदतीचा पुन्हा हातभार लागणार आहे.ताईंची बांधकाम सभापती निवड झाल्याने सर्वत्र एकच आनंदाचा ओघ पाहायला मिळत असल्याने ताईंना अभिनंदनाचा वर्षाव व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post