BIG BREAKING NEWS...

505 डायलेसिस रूग्णांनी घेतले उपचार ; 505 चा केक कापून कौतूकाचा वर्षाव...

 

दि,29,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात नागरिकांना अत्यावश्यक तसेच सुसज्ज सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोणातून सदैव आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्यातून व ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या मार्गदर्शनातून त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे नेत्रशल्यचिकित्सक तथा वैद्दयकिय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्या सहकार्याने आज ठाणे जिल्हयात मुरबाडचे ग्रामीण रूग्णालय नंबर 1 म्हणून समोर आले आहे.पुर्वी फारचा विचार केला तर रूग्णालय होते परंतु उपचाराकरिता डॉक्टरांची कमतरता तर औषधांचा कमी असा साठा त्यातच उपचारिक इंजेक्शने यांचा तुटवडा असायचा.पहिले ग्रामीण भाग सुविधापासून वंचित असायचा परंतु आज येथिल नागरिकांनी उपचार घेण्यासाठी ग्रामीण रूग्णालयाला पसंतू दर्शविली आहे.आज डॉक्टरांबरोबर औषधाचा भरमसाठ साठा,सर्व प्रकारच्या तपासण्या उपलब्ध,गर्भवती महिलांची सिसेक्शन डिलीव्हरी,सर्व प्रकाराचे तातडीने उपचार,अधिपरिचारिका नागरिकांच्या सेवेसी तत्पर व कर्मचारी वर्ग आपली जबाबदारी सांभाळतांना दिसले आहेत.असे असताना मुरबाडच्या नागरिकांना गरज होती ती म्हणजे झालेल्या आजाराकरिता डायलेसिस सेवा मिळावी.याकरिता मुरबाड ग्रामीण रूग्णालयात डायलेसिस सेवा ही 22 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू केली.त्यानंतर,आमदार किसन कथोरे,ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी भेट देऊन उपाययोजना जाणून घेतल्या आणि आजपर्यंत मुरबाड ग्रामीण रूग्णालयात चक्क 505 रूग्णांनी मोफत डायलेसिस उपचार घेतले असून या डायलेसिस विभागात सेवा देण्यासाठी किडनी विकार तज्ञ डॉ.प्रजोल पवार,2 डायलेसिस तंत्रज्ञ म्हणून निलम राऊत,दर्शन भोर तर 2 अधिपरिचारिका प्राजक्ता पडवळ,मेघा पवार त्याचबरोबर सफा कामगार मिना धनगर उपलब्ध असल्याची माहिती देत चक्क 15 लाखाच्या आसपास रूग्णांची रक्कम वाचले असल्याचे मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे नेत्रशल्यचिकित्सक तथा वैद्दयकिय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी आमच्याशी बोलतांना दिली.याचेच औचित्य साधून 505 डायलेसिस नावाचे केक यावेळी कापून या सर्व सेवा देणार्‍यांचा अनोखा कौतूकेच्या वर्षावातून आभार मानून त्यांचे शब्दसुमनाने धन्यवाद देण्यात आले.याच ग्रामीण रूग्णालयात आता  सुश्रृत प्रणाली (ऑनलान केस पेपर) सुरू झाले असूण आता रूग्णांना आरोग्य सेवा ऑनलान पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये आता एकदाच नागरिकांना रजिस्ट्रेन झाले असल्यास एक नंबर मिळेल त्यामुळे आधारकार्ड किंवा आभाकार्ड जो मोबालला लिंक असेल तो घेऊन यावे लागणार आहे.सर्व नागरिकांनी आभा कार्ड काढून घेणे गरजेचे असून या माध्यमातून जलदगतीने आपले रजिस्ट्रेशन होऊन आपले जुने आरोग्याशी संबंधित उपचार सहजपणे पाहता येल त्यामुळे लवकरच आपण आभाकार्ड काढून घ्यावेत व  सुश्रृत ऑनलान प्रणालीचा लाभ घ्यावे असेही यावेळी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.या 505 डायलेसिस कौतुक वर्षावात समस्त तज्ञांच्या हस्ते केक कापून सेलिबे्रट करण्यासाठी या ग्रामीण रूग्णालयचे वैद्दयकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे,डॉ.सुतार,वैद्दयकिय सहाय्यक माणिक गायकवाड,क्लार्क संतोष सुरवसे,डॉ.प्रजोल पवार,निलम राऊत,दर्शन भोर,प्राजक्ता पडवळ,मेघा पवार,मिना धनगर,चेतन उघडे,प्रवीण सकपाळ,तक्त तपासणी बिभाग अधिकारी,ऑफिस विभाग अक्षय तांदळे,योगेश घोडविंदे यांसह अन्य स्टाफ कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

Post a Comment

Previous Post Next Post