(दि.15,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
पावसाळा सुरू होत असून या पावसाळयात वादळी वारासह जोराचे
पाऊस येण्याचे संकेत नाकारता येणार नसून अतिदक्षता नागरिकांनी घ्यावी म्हणून तमाम बांधवांनी
खबरदारी घेण्याचे आवाहन मुरबाड नगरपंचायतीचे धडाडीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी
केले आहे.मागील वर्षी वादळी वारा
पावसाने मोठया प्रमाणात थैमान घातले होते त्यावेळी संबंधित यंत्रणा ही सज्ज करून त्यावर
नियंत्रण आणण्यासाठी मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मेहनत
विभाग अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतली होती.यावेळीही श्री.म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष आढावा बैठकीत यंत्रणा सज्ज करण्यात आले
असल्याचे कळाले असून नागरिकांनीही आपली खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.
मुरबाड नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी
धोकादायक वृक्ष किंवा त्यांच्या फांदया नगरपंचायतीची परवानगी घेऊन तातडीने छाटणी करून
घ्यावीत तसेच घोषित जुने मोडकळीस जुने घरे,इमारती तात्काळ पर्यायी जागा पाहून खाली करावेत,रस्ते गटारे यांच्या बाजुला बांधकाम साहित्य डेब्रीज असल्यास त्यास उचलून घ्यावे,पाऊस सुरू असताना विद्दयुत पोल,तारा यांना स्पर्श करू
नका,अतिपाऊस पडत असता अतिशय विनाकारणे घराबाहेर पडू नका,पावसाळयात पिण्याचे पाणी गरम उकळून प्यावेत,पुरपरिस्थिती
जेथे असेल तेथे जाणे टाळणे,वृध्द अपंग,लहान
बालके यांची प्रथम काळजी घ्यावी यांसह आपत्कालीन यंत्रणेत आपल्या परिसरात कोणतेही प्रसंग
उद्भवल्यास तत्काळ आपत्ती नियंत्रण कक्षात संपर्क करून कळवावे जेणे करून आपण सर्व आपत्कालीन
प्रसंगावर मात करू असे आवाहनही मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी तमाम जनतेला आमच्या या
माध्यमातून केले आहे.


Post a Comment