BIG BREAKING NEWS...

देवाभाऊच्या राज्यात अधिकारी टक्केवारीसाठी ठेकेदाराकडे झाले लाचार...

 

दि,29,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

आज राज्यात व देशात मोदी सरकारचं राज्य आहे अशी चर्चा सर्वत्र ठिकाणी एैकायला येत असून राज्याच्या विकासाचा पाया जोमाने पुढे जातांना दिसत आहे परंतु एका बाबतीत सरकार कधीही यशस्वी ठरली नाही ती म्हणजे भ्रष्टाचार टक्केवारी मुक्त महाराष्ट्र.गेल्या काही महिण्यांपासून कोण कोणाची टक्केवारी घेतो आणि कोण कोणाचे काम करतो या आशयाचे चित्र समोर येऊन गेले असता चक्क देवाभाऊच्या राज्यात अधिकारी कामांच्या टक्केवारीसाठी ठेकेदाराकडे लाचार झाले आहेत.एखाद्दया कामात ठेकेदार हा कर्जबाजारी होल अशा परिस्थितीत अधिकारी टक्केवारीचे हप्ते गुंडाळीत आहेत.यामध्ये ठेकेदार मात्र हतबल झाला असून अनेक तक्रारी असताना अधिकारी आपल्यावर कालांतराने रोष काढतील म्हणून देवाभाऊच्या राज्यात अधिकारी वर्गाला भयभित होऊन ठेकेदार टक्केवारी देऊन बळी पडत चालले आहे.एखाद्दया कामासाठी ठेकेदार हा सर्वस्व पणाला लावून विकास निधी आणतो परंतु अधिकारी मात्र त्याच निधीवर खुर्चित बसून बोलघेवडेपणाने व आपल्या अधिकारातून टक्केवारीची मागणी करून ठेकेदारासमोर भिकारी सारखे लाचारी पत्करतांना दिसले आहेत.अशी अनेक प्रकरणे असल्याने आपलेच दात आणि आपले ओठ त्यामुळे कोण कोणाच्या पाठिशी आहे हेच कळेनासे झाले आहे.एका सहीची टक्केवारी ठेकेदाराला काम घेतल्यावर जिवावर बेतते.आज अधिकारी वर्ग यांच्याकडे पाहिले तर काही ठेकेदार टु व्हिलर वर काम मिळविण्यासाठी धडपडत असतो तर अधिकारी मात्र आपल्या अलिशान गाडीत फिरत असतो त्यामुळे ठेकेदारांचा अशिर्वाद अधिकारी यांच्यावर असल्याने अधिकारी मात्र टक्केवारी माफ किंवा कमी करण्यापेक्षा वाढ केली असल्याची एक तक्रार चक्क एका ठेकेदारानी आमच्याकडे केली आहे.2,3,5,7 टक्केची मागणी करून भ्रष्टाचाराला पाठिशी घालणरे अधिकारी ठेकेदाराचे जीव भविष्यात घेतील अशी शक्यता नाकारता येणार नाही.देवाभाऊच्या राज्यात भ्रष्टाचार होणार नाही,अधिकारी वर्गाला टक्केवारी देऊ नका असे अनेक जण बोलले परंतु त्याची प्रचिती कमी न होता टक्केवारीतून जादा प्रमाणात वाढली असल्याचे जाणकरांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.नविन अधिकारी यांनी तर लोकप्रतिनिधींसारखी खेळी केली असून आपल्या हाताशी 3 ठेकेदार ठेवून वेळ पडेल तिथं आलं पाहिजे अन्यथा पुढे आम्ही तुमच्या कामाला प्रोत्साहन देणार नाही अशी वजा धमकीच एक प्रकारे दिली जात असल्याने ठेकेदारी भविष्यात ठेकेदारी न केल्यास विकासाची गती देवाभाऊ कोणाकोणाच्या आधारे पुढे नेतील असा प्रश्‍न उपस्थित राहत आहे त्यामुळे देवाभाऊ आपण अधिकारी यांच्या आर्थिक बाबींची आर्थिक गुन्हे शाखेकडून का लावीत नाही असा प्रश्‍न एका पत्रकारानी थेट आमच्या माध्यमातून केला आहे.देवाभाऊ आपले कार्य तुफान आहे परंतु ठेकेदाराचे जीव अधिकारी टक्केवारी वाढून वाढून घेत असल्याने ठेकेदाराच्या बाजुने प्रत्यक्षपणे उभे रहा असा सल्लाही देण्यात येत आहे.(उर्वरित पुढील भागात)

 

 

Post a Comment

Previous Post Next Post