BIG BREAKING NEWS...

48 तासातच 'ती’ चिमुकली सुखरूप पालकांच्या स्वाधीन ; टिटवाळा पोलीसांची धडाकेबाज कामगिरी...

दि,18,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

कल्याणमधून 7 वर्षीय बालिका श्रृती पवार ही बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला.श्रृती पवार ही तिच्या आजोबांसोबत जाण्याचा हट्ट करित होती मात्र त्यांनी नकार दिल्यावर ती घरातून त्यांच्यामागे गुपचूप बाहेर पडली आणि नंतर परत आलीच नसल्याने परिसरात शोधाशोध करूनही ती आढळून न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याने क्षणाचाही विचार न करता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डी.एस.स्वामी यांच्या अधिपत्याखाली व अपर पोलिस अधीक्षक राहुल झालटे आणि उपविभागीय अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी विशेष सुचना दिल्या.या तपासात सिंघम म्हणून ओळख असलेले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी तात्काळ मिळालेल्या सुचनांचे पालन करून आपली यंत्रणा सज्ज केली.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल पाच पथके तयार करण्यात आली.पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी पाच पथकांच्या मदतीने त्या बालिकेची शोधमोहीम सुरू केली.

रेल्वे मार्गावरील तब्बल 29 स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि तांत्रिक विश्‍लेषणाचा वापर केला.अखेर महत्त्वाचा धागा हाती लागला.कुर्ला स्थानकावर श्रृती ट्रेनमधून उतरून प्लॅटफॉर्मवर चालताना दिसली.त्यानंतर सिंघम म्हणून सदैव चर्चेत असलेले पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्यासह त्यांच्या पथकांनी थेट कुर्ला रेल्वेस्थानकातुन श्रृतीला सुखरूपपणे ताब्यात घेतले.

सदरचे धडाडी शोधमोहीम कार्य राबवून अवघ्या 48 तासातच पोलिसांनी सुखरूप 7 वर्षीय बालिकेला पालकांच्या स्वाधीन केल्याने पालकांसह सर्व नागरिकांनी पोलिस निरीक्षक पंकज गिरी व सर्व पथकांचे आभार मानून त्यांचे कौतूक केले आहे.या धडाडी कार्यात महाराष्ट्र पोलिस कुठेही आणि कशातच कमी नाही म्हणून बंजारा समाजाच्या वतीने पोलिसांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post