दि,08,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड एमआयडीसी येथील मुरबाड तहसिलदार कार्यालयासमोरील रोड लगत आरूषिक हॉटेलच्या जवळील रस्त्यावर अज्ञातांनी बायोवेस्ट कचरा उघडयावर फेकल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला गेला आहे.मुरबाड एमआयडीसी हद्दीत सध्या 2 दवाखाने असून नेमकी हा बायेवेस्ट कचरा कुणाचा यावर प्रशासनानी कोणतीही शोधमोहीम हाती घेतली नाही.आरोग्याविषयी सरकार जागृत आहे परंतु सुया,सिरीज,रक्ताने माकलेल्या सामुग्री टाकणारा अज्ञानी आहे असेच कृत्य सध्या समोर आहे.
हा परिसर नागरिकांच्या येण्या जाण्याचा असून समोरच मुरबाड तहसिल कार्यालय आहे त्यातच कौशल्य हॉस्पिटल व मोरया हॉस्पिटल तसेच औषध साठा गोडाऊन बाजुला असून मुरबाड नगरपंचायतीकडून संबंधितांना दर महिण्यांचा अहवाल सादर करण्यासाठी पत्र दिले आहे.झालेल्या पंचनामाच्या अनुषंगाने बायोवेस्ट घनकचरा टाकल्याने ज्यांना पत्र देण्यात आले त्यांचेकडुन काय खुलासा प्राप्त झाला?कोणाकडे बायोवेस्ट दाखला आहे व कोणाकडे नाही?केव्हापासून दाखला घेण्यात आला? हॉस्पिटलचा जर हा कचरा असेल तर हॉस्पिटल चालू होण्याअगोदर की चालु झाल्यानंतर दाखला घेण्यात आला? जैववैद्दयकीय कचरा टाकतांना चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे असून आरूषिक हॉटेलच्या प्रमुख प्रवेशदारातही कॅमेरे आहेत त्या कॅमेरेतून कोणता पुरावा हाती लागला? बायोवेस्ट कचरा रात्री टाकला की दिवसा ढवळया? असे अनेक प्रश्न चौकशी दरम्यान लक्षात घेणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोणातून गरजेचे आहे त्यातच अज्ञाताचा शोध तात्काळ घेऊन गुन्हा दाखल करावे अशी मागणी आता जो धरू लागली आहे.
सापडलेल्या बायोवेस्ट कचर्यात वापरलेले सुया,इंजेक्शन कोणत्या मेडिकलमधून घेतले गेले व कोणी घेतले ते कोणाला वापरले गेले याचा रेकॉर्ड मेडिकलमधून मिळेल.नागरिकांच्या जीवाशी खेळ केले जात असून एमआयडीसीमध्ये जैववैद्दयकीय घनकचरा टाकणारा अज्ञानी याचा शोध न घेतल्यास कालांतराने प्रशासकाचे भय राहणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न कायमच राहील त्यामुळे प्रशासकांनी आतातरी याकडे कानाडोळा न करता त्या अज्ञात डॉक्टरावर कधी व कोणत्या स्वरूप कारवाईची भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.(उर्वरित पुढील भागात)

Post a Comment