BIG BREAKING NEWS...

शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी - पत्रकार कुणाल शेलार

दि.27,BY,POL,ठाणे-

नुकताच अवकाळी अतिवृष्टी पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे.अतिवृष्टी पावसाने तसेच वादळी वाऱ्याने विजेच्या कडकडाटसह सर्वत्र तांडव भूमिकेतून रंग दाखवला आहे.ठाणे जिल्ह्यात सध्या अवकाळी अतिवृष्टीच्या दृष्टीने पावसाने थैमान घातला असून मुरबाड तालुक्यात शेतीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकरी बांधव हातबल झालेले आहेत.शेतकरी बांधवांच्या शेतात लावण्यात आलेल्या भात पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडला आहे.कर्जबाजारी झालेल्या शेतकरी अतिवृष्टी अवकाळी पावसाच्या आगमनाने भाताच्या नुकसानीने नैराश झालेला असून यातून आत्महत्या होण्याचा संभाव नाकारता येणार नाही. अँऐन सणासुदी अर्थात दिवाळी ही शेतकऱ्यांची चिखलात गेली असून नुकसानीमुळे बळीराजांचे मोठ्या प्रमाणात नुकसानीसाह हाल सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे.मुरबाड तालुक्यातील कळमखांडे,घोरले,किशोर,धसई,टोकावडे,सरळगाव,म्हसा,खाटेघरे,शिवळे यांसह सर्व गाव परिसरातील शेतकरी बांधवांच्या शेतात पाणी साचल्याने सर्वच भात पीक ही पाण्यात तरंगताना व पाण्यात सडली असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे अशा शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न भेडसावत असून सरकारच्या आदेशानुसार पिक विमा करूनही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना तुटपुंजी नुकसान भरपाई मदत न देता हेक्टरी 50 हजार मिळावी अशी मागणी पत्रकार कुणाल शेलार,संदीप गायकर यांनी सरकारकडे केली असून शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई मिळावी म्हणून आग्रही मागणी लेखी निवेदणाद्वारे आहे. सदर आग्रही मागणीचे निवेदन आज मुरबाड तहसिलदार श्री.अभिजीत देशमुख यांना देण्यात आले. 

मुरबाड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली आहे.निवेदनादरम्यान मुरबाड तहसिलदार श्री.देशमुख यांनी जिल्हाधिकारी मार्फत शासनाकडे तात्काळ निवेदन पाठवण्यात येईल अशी ग्वाही दिली.

          त्यातच सरसकट मागणीच्या दरम्यान माहिती अशी मिळाली की एकाच सातबारा वरती सामूहिक खातेदार असल्याने नेमकी कोणाच्या खात्यात भरपाई रक्कम ही जमा करण्यात येईल या अनुषंगाने सदरील सामूहिक खातेदार यांनी आपापसात विचार विनिमय करून संमती पत्र त्याचबरोबर ऍफिडेविट देऊन द्यावेत जेणेकरून याबाबत प्रशासनाला लवकरात लवकर भरपाई रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करता येईल असे यावेळी तहसिलदार श्री देशमुख यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.मागील वर्षाच्या एकूण दहा हजार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यात आले होते,त्यापैकी दरम्यान आठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात आली आहे परंतु उर्वरित दोन हजाराच्या आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सामूहिक हिस्सेदार असल्याने खातेदाराच्या खात्यात रक्कम जमा करावयाची बाकी आहे.याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी अद्याप कोणतेही प्रकारचे संमती पत्र ॲफिडेविट दिलेले नाहीत त्यामुळे दोन हजाराच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात आलेली नाही.त्यामुळे तात्काळ अशा शेतकऱ्यांनी मुरबाड तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी,नुकताच झालेल्या अवकाळी अतिवृष्टी पावसाच्या आगमनाने त्याच शेतकऱ्यांना पुन्हा नुकसान भरपाई देण्यासाठी त्याच स्वरूपाची अडचण निर्माण होईल म्हणून आजच सामूहिक खातेदार यांनी घरगुती आपापसात चर्चा करून निर्णय घेऊन सदरची माहिती मुरबाड तहसिल कार्यालय तसेच संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडे देण्यात यावी याबाबतचे आवाहन मुरबाड तहसिलदार श्री.अभिजीत देशमुख यांनी आमच्या माध्यमातून केले आहे.

          काही जण सोशल मीडियावर विविध प्रश्नार्थिक पद्धतीने बोट ठेवून निपक्ष पातीची पत्रकारिता करणाऱ्यांवर यावर बोट ठेवण्याचे काम करीत असून त्यांनी अजून खरे पत्रकारांना ओळखले नसून यापेक्षा दुर्दैव काय असेल असे पत्रकार कुणाल शेलार यांनी आपले मत या माध्यमातून व्यक्त केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post