(POL,कुणाल शेलार - मुरबाड)
माळशेजघाटात नेसर्गिक
असे सर्वात मोठी नैसर्गिक
2 हजार फुट झीप लाईनसह 1 हजार फुटाचा भारताचा
तिरंगा उभारले असून त्याचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे यांच्या
शुभहस्ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मोठया जल्लोषीय थाटामाटात
करण्यात आले.
आमदार
श्री.कथोरे यांच्या उपस्थितीत मुरबाड तिनहात नाका येथून भव्य बाईक रॅली सरळगाव,उमरोली,टोकावडे मार्गे माळशेज घाटामधील एमटीडीसी पर्यटन
स्थळाजवळ काढण्यात आले.यावेळी आमदार किसनराव कथोरे यांच्या उपस्थितीत
सर्व बाईकस्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले.यावेळी
आमदार श्री.कथोरे यांच्या एका आवाहनावर माळशेजघाटात हजारो युवकांनी
सहभाग नोंदविली होता.यावेळी आमदार श्री.कथोरे यांच्या आवाहनानंतर तरूण वर्गांची जी गर्दी झाली आणि 1 हजार फुटाचा आपल्या भारताचा तिरंगा माळशेजघाटात उभारण्याकरिता संबंधित पथकांची
स्तुत्य प्रशंसा केली यावेळी आमदार श्री.कथोरे हे आपल्या प्रतिक्रिया
देतांना भावूक झाले होते.माळशेजघाट काचेच्या पुलाची मंजुरी घेतली
असून लवकरच पर्यटण स्थळ व येथील लोकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून पुढील वाटचाल
असताना आज 2 हजार फुट झीप लाईन व 1 हजार
फुटाचा आपल्या भारताचा तिरंगा माळशेज घाटात उभारले असून याची गिनीज बुकात नोंद होणार,महाराष्ट्रातील ठाणे जिल्हयाचं,मुरबाडचं एक स्वप्न तयार
होत आहे,पर्यटनाचं दर्जेदार स्थळ पुढे घेऊन जाण्यासाठी हे प्रयत्न
केले असून भविष्यात माळशेज राहणार नाही तर जगाच्या नकाशावर जाणार,त्यामुळे हे सर्व प्रकल्प चांगल्या प्रकारे मार्गाला लागतील असे आमच्याशी बोलतांना
सांगितले.यावेळी या भव्यदिव्य जल्लोषीय थाटामाटाच्या उद्घाटनाला
उल्हासभाऊ बांगर,सुहास मोरे,अनिल घरत,नितीन मोहपे,लियाकत शेख,दिपक पवार,देवा गु्रप फाऊंडेशनचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज देसले,रविंद्र पठारे(लॅब,मुरबाड)अरूण पाटील,मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मुकेश विशे,संतोष चौधरी (नगरसेवक,मुरबाड नगरपंचायत),दिनेश उघडे,यांच्यासह नागरिक,तरूणवर्ग
हजारोच्या मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार किसनराव कथोरे यांनी तमाम जनतेला
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Post a Comment