(POL,कुणाल शेलार - मुरबाड)
गेल्या अनेक वर्षात
अनेक पोलीस मुरबाड पोलीस ठाण्यात रूजू होऊन इतर ठिकाणी नागरिकांच्या संरक्षणासाठी बदलीतून
निघून गेली परंतु
2024 सालात माणसातील माणसूकी झरी जपणार्या अशा
पोलीस निरीक्षकाच्या बदलीने अखेर मुरबाडकर रडला.का तर असा पोलीस
अधिकारी गेल्या अनेक वर्षात आलेला आणि झालेला पाहिला नाही.नेहमी
आदराच्या छत्रसावलीची माऊली असलेल्या व मुरबाड तालुक्यातील नागरिकांच्या संरक्षणाची
जबाबदारी सांभाळून कर्तव्य पार पाडतांना कधीही कोणाबाबतीत दुजा भाव झाला नाही.ये,बस,चहा घे असे आजपर्यंत सर्वसामान्यातील
प्रत्येक नागरिकांसोबत कधीही झाले नाही ज्यावेळी असा आपुलकीचा व्यक्तीमत्व आपल्या जीवनात
येतो तेव्हा जीवनाची गोडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण होते अशी गोडी लावणारे,अनेकांच्या हृदयात ज्यांनी कौटूंबिक सदस्येचा स्थान निर्माण केलं,ज्यांच्या बारकार्इ लक्षकेंद्रितने आजपर्यंत 2 वर्षात
रात्रीमध्ये चोरी झालेली नाही,ज्यांनी दोन वादात मैत्रीता निर्माण
करून दिली,ज्यांनी वयोवृध्दांचा वाढदिवस साजरा करून त्यांना मुलासारखा
आहे मी असे म्हणत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यथोचित सन्मान केला,ज्यांचा प्रत्येक पत्रकाराला,विविध पक्षातील कार्यकर्ते
पदाधिकारी तसेच मित्र परिवाराला विविध सणात स्वतःहून आमंत्रित केले जाणारे,पोलीसांसमवेत मुरबाडकरांचे आदरस्थान असलले व राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित
झालेले ठाणे ग्रामीण जिल्हयाचे मुरबाड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष,धडाडीचे पोलीस निरीक्षक श्री.प्रसादजी पांढरे साहेब हेच
आहेत.गेल्या 2 ते अडीच वर्षात वपोनि.श्री.पांढरे साहेब यांनी अनेक दाखल अशा विविध केसचा तपास
विविध यंत्रणेच्या माध्यमातून लावला.त्यांच्या असंख्य केसेसमध्ये
त्यांच्या कामाची पध्दत वरिष्ठ अधिकारी यांना ज्ञात असल्याने श्री.पांढरे साहेबच याचा उलगडा करतील असा विश्वास कायम होता.मुरबाडकर जनतेच्या विविध तक्रारी सोडविण्यास वपोनि.श्री.पांढरे साहेबांचे अमुल्य योगदान ठरले आहे.कोणत्याही सभा,उपोषण दरम्यान साहेब त्याठिकाणी हजर असल्याने सभा कडेकोट बंदोबस्तात पार पडायच्या
तर साहेबांच्या सहकार्याने उपोषणकर्ते उपोषण स्थगित करायची इतकी मोठी अधिकारातील माणूसकीची
ताकद आज मुरबाड तालुक्यातून बदली होऊन रायगड जिल्हयात गेली आहे.साहेबांच्या बदलीची मुरबाडकरांना जशी माहिती मिळाली त्यावेळी हजारोंच्या स्टेटसवर
त्यांच्यावर किती आणि काय प्रेम असते हे समोर आलेच.साहेबांचे
नैतिक धोरणेचे सर्वच फॅन होते.त्यांच्या कटिबध्द अशा शिस्तप्रियेची
अनेकांनी प्रेरणा घेतली.जनसामांन्याना प्रेम आपुलकी स्नेहात सामावून
घेतले,एक कौटूंबिक नातं निर्माण केलं,एखादे
समोर कोणताही अन्याय अत्याचार विषय आल्यास सर्व बाबी पडताळून त्वरित निर्णय घेतले कोणावरही
अन्याय आजपर्यंत झाले नाही.उत्तम समन्वयक म्हणून त्यांचे विचारशैली
पध्दत सर्वांना पटनारी होती.अशा सर्वधर्म समभावात अनेकांच्या
कार्यक्रमात आवर्जुन सामील असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.प्रसादजी पांढरे साहेबांच्या बदलीत मुरबाडकरांच्या डोळयात पाणी आल्याने सर्वत्र
भावुक असे वातावरण त्यांच्या निरोप समारंभावेळी निर्माण झाले होते.यावेळी निरोप समारंभाला मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे यांनी यावेळी
निरोप समारंभावेळी भेट देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच मुरबाड पोलीस ठाण्यात आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात सर्व धर्म समभावातील
जनसमुदाय,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,विविध पक्षातील ज्येष्ठ तसेच कार्यकर्ते पदाधिकारी,विविध
शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी,नागरिकांची मोठया प्रमाणात
गर्दी होती.वपोनी.श्री.पांढरे साहेबांनी समाजासाठी अनेक सामाजिक कार्य केले असून अमुल्य रत्न त्यांच्यात
पाहिले असता त्यांचे दै.पॉवर ऑफ लोकशाही वृत्तपत्राच्या वतीने
समारजरत्न पुरस्काराने सौ.मयुरी कुणाल शेलार,कु.संजना कापडी,अॅड.किरण थोरात यांनी सन्मानित केले आहेत.
वपोनि.श्री.पांढरे साहेबांनीही मुरबाडकरांनी जे प्रेम दिले ते अविस्मरणीय आहेत त्या श्वास असेपर्यंत पुसल्याही जावू शकणार नाही असे प्रेम माझ्यासारख्या अधिकाराला
मिळाले ही माझी शक्ती आणि हीच माझी ताकद असल्याने आज वेगळया ठिकाणी जात असताना आपले
हे अतुट नाते असेच कायम माझ्या हृदयात राहणार असून या आठवणी तुमचा सहवास मी येथून घेऊन
जात असल्याच्या प्रतिक्रिया भावनिक भावनेतून त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी मनोगतात
आपले विचार मांडत असताना सर्व मुरबाडकर भावुक झाले,तर काही रडले हा क्षण टिपतांना
अनेकांच्या चेहर्यावर आनंदाचे क्षण काही क्षणभंगूर म्हणून हरपले
होते.साहेबांना मुरबाडकरांनी मोठया थाटामाटात बदलीच्या ठिकाणी
निरोप देत असतांना त्यांची भव्य दिव्य अशा रॅलीच्या माध्यमातून पुढील वाटचालीस यशाची
व आनंदी निरोगी जावो अशा शुभेच्छांचा यावेळी वर्षाव करण्यात आला.
लहान मुलांवर सर्वात जास्त प्रेम करणारे वपोनि.श्री.प्रसादजी पांढरे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी पत्रकार कुणाल शेलार,सौ.मयुरी कुणाल शेलार यांचे सुपुत्र कु.वीर कुणाल शेलार गेले असता त्याला चक्क आपल्या खुर्चित बसवून त्याच्या डोक्यावर पोलीसांचे मान असलेल्या खाकी वर्दीवरील डोक्यावरील कॅप वीरच्या डोक्यावर घालून मान दिले हे क्षण लहान बालकासाठी त्याच्या जीवनात अविस्मरणीय ठरले असून कु.वीर शेलार याने मलाही पोलीस व्हायचंय अशी जिद्दच या लहान वयात मनाशी बांधली आहे.
Post a Comment