BIG BREAKING NEWS...

प्रलंबित तक्रारीची चौकशी तालुका आरोग्य अधिकारी यांनी करावी; पत्रकार कुणाल शेलार यांची मागणी...

(दि.10,POL - मुरबाड)

मुरबाड तालुक्यातील हॉस्पिटल व क्लिनीक यांच्या तक्रारी काही प्रलंबित असून या तक्रारीवर अद्दयापही कारवार्इ झालेली नाही.यासंबंधी काल बातमी प्रसिध्द करण्यात आली होती.त्या बातमीवर काही प्रतिक्रिया प्राप्त झाल्या असून आमची भूमिका हीच तक्रारदाराची भूमिका असल्याचे सांगण्यात आले आहे.तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी विभाग यांनी जुन्या प्रलंबित व धुळखात पडलेल्या तक्रारी आहेत त्यावर तत्काळ चौकशी करावी अशी मागणी पत्रकार कुणाल शेलार यांनी केली आहे.तक्रारदारांच्या तक्रारी येतात परंतु गोडगंबाल पध्दतीने तक्रारीवर कारवार्इ केली जात नसल्याची म्हणायची वेळ आज आली आहे.

          हॉस्पिटल मधील किती नोंदणीकृत स्टाफ त्यांच्या खाटा किती व कुठे ? कोणकोणत्या योजना चालु तर किती हॉस्पिटल अधिकृत जागेत व किती अनधिकृत म्हणून घोषित आहोत का त्यावर काय कारवार्इ झाली,तसेच फायर ऑडीट कुठले दाखवण्यात आले ते घेतांना कोणकोणती प्रक्रिया कशा पध्दतीने केली यांसह सर्व बाबतीची चौकशी होणे गरजेचे असून क्लिनीक तालुक्यात तर अनेक गावांत असून चांगल्या डॉक्टरांकडून नागरिकांची सेवा होत आहे परंतु काही ठिकाणी सुरू असलेल्या क्लिनीकमध्ये शिकाऊ स्टाफ व नोंदणीकृत आहे काय ? याचीही चौकशी झाल्यास पुन्हा मागील पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता चौकशीतून घ्यायला हवी.अलीकडे पावसाळा सुरू झाला असून आजारपण केव्हाही तोंड वर काढू शकतात त्यामुळे याचीही दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी अशी विनंती या माध्यमातून करण्यात आलेली आहे.संबंधित प्रलंबित तक्रारी चौकशा यावर तालुका आरोग्य अधिकारी विभागाने तत्काळ लक्ष वेधून महिणे अखेर स्थळपाहणी आढावा माहिती ऑफीस फलकारवर दैनंदिन पध्दतीने प्रसिध्द करावे व त्याची माहिती ही जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पाहोचवावी त्याचबरोबर प्रलंबित तक्रारीची स्थळपाहणी चौकशी दरम्यान दोषी आढळल्यास तत्काळ कारवार्इ करावी अशीही मागणी श्री.शेलार यांनी केली आहे.

 

 


Post a Comment

Previous Post Next Post