BY,दि.12,POL-कुणाल शेलार,मुरबाड -
महाराष्ट्र शासन ठाणे वनविभाग व मुरबाड तालुका शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने "एक पेड माँ के नाम अभियान" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच आजच्या या कार्यक्रमात "वृक्ष लावा दारोदारी,समृद्धी होईल घरोघरी" या ब्रीद वाक्याखाली शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष रोपण संवर्धनाचे महत्व पटवून देत आमदार तथा मुरबाड तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.किसन कथोरे यांच्या शुभहस्ते विध्यार्थांना वृक्ष वाटप करून पुढे श्री.कथोरे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्यात आले.
या कार्यक्रमाला टिडीसी बँकेचे संचालक श्री.राजेश पाटील,मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष श्री.मुकेश विशे,मुरबाड तालुका खरेदी विक्री महासंघाचे अध्यक्ष श्री.संतोष पवार,मंडळ अध्यक्ष श्री.जितेंद्र भावार्थे,श्री.अतुल देशमुख,वनविभाग मुरबाडचे अधिकारी श्री.संजुदास राठोड(पश्चिम),श्री.महेशकुमार शिंदे(पूर्व),वनविभाग टोकावडाचे अधिकारी श्री.राजवर्धन भोसले, टोकावडा उत्तरचे अधिकारी श्री.डफडे,वनपाल व वनरक्षक विनोद लोदवाल,वनविभागाचे श्री.कपिल पवार,तसेच वनपालचे अधिकारी,कर्मचारी
तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे सचिव श्री. किसन चौधरी सर,संचालक श्री.भाई खंडागळे,श्री.स्नेहल शहा, श्री.मोहनिष तेलवणे,प्राचार्य श्री.राकेश पाडवी सर,उपप्राचार्य श्री. जयवंत कराळे सर,स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्यध्यापक श्री.बडगुजर सर,पर्यवेक्षक श्री.भूपेश भालेराव सर,श्री. प्रदीप धोंडगे पाटील सर,श्री.अरुण गोंधळी सर,श्री.जयेश खंडागळे सर,सौ. मनिषा पठारे,सौ.नम्रता मोहपे,श्री.दिनेश देसले सर,श्री. महेंद्रसिंग जाधव सर,श्री. कैलास माळवदे सर,व शाळेचे पदाधिकारी,सदस्य शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment