दि,13,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड तालुक्यातील नामवंत ती शाळा व महाविद्दयालय आहे जिथं गेल्या 2 वर्षापूर्वी कंत्राटदार शिक्षकाला घेण्यात आलं.त्यावेळी बॅनरबाजीवर भरती सांगून 10 ते 14 हजार पगार देण्याचं दाखविले.कालांतराने मुरबाडचे ते शिक्षकाला घेऊन विद्दयार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी सोपविली.त्या शिक्षकाने ती जबाबदारी सांभाळत असताना पहिल्या वर्षी 7 तुकडया अर्थात वर्गाचे काम पाहिले.नंतर पुढिल वर्षी 10 वी चे 8 वर्ग दिले तेव्हाही त्यांनी आपली जबाबदारी सांभाळण्यासाठी योगदान देण्याचे ठरविले परंतु या शिक्षकावर कोणाची खारफाटी नजर होती ते मात्र गुलदस्त्यात राहिले त्या शिक्षकावर ताण देण्यासाठी 9 वी वर्गशिक्षक म्हणून देण्याचे वरिष्ठांनी ठरविले.यामध्ये त्या शिक्षकांनी वरिष्ठांना विनंती केली आणि धाडसाने बोलले की,मला इतका ताण सहन होणार नाही,विद्दयार्थ्यांचे पेपर तपासणे,रिझर्ल्ट बनविणे,10 वीचे ऑनलाईन कामे,त्यातच 9 वी चे वर्गशिक्षक म्हणून दिल्यास मला कसे काय झेपवणार याचा राग मनात धरून एका शिक्षकाने मार्मिक मध्ये धमकी दिली की,काम करावं लागेल अन्यथा तुम्हाला पुढच्या वेळी घ्यायचे की नाही हे आम्ही ठरवू यावर त्या कंत्राटदार शिक्षकाने ते देखील भितीपोटी काम केले.परंतु हा शिक्षक निघेनासे झाल्याने एक वर्ग अतिशय आरडाओरड करत असल्याने ते त्या कंत्राटदार शिक्षकाच्या आवाक्याबाहेर गेल्याने त्या मुद्दाचे कारण करून त्या शिक्षकाला थेट घरीच बसविले.हा मुद्दा छोटाच होता परंतु मोठं कारण करून विषय टोकाला नेला,त्या कंत्राटदार शिक्षकाची बाजू एैकूण घेण्यासाठी कोणी तयार नसून मिलीभगत असलेल्या वरिष्ठ शिक्षक मंडळात नंतर आनंदाचे वातावरण निर्माण झाले.आता नव्याने शिक्षक भरती घेऊन जुन्या शिक्षकांना बाहेर करण्याचा महाप्रताप कारनामा मुरबाड तालुक्याच्या एका महाविद्दयालयात झाला आहे.इथं '' हम करे सो कायदा '' अशी भूमिका घेऊन खाली काय घडतंय आणि वरिष्ठांना माहिती नसल्याने बनावाच्या गोष्टी रंगविल्या जात आहेत.त्याच कंत्राटदार शिक्षकाचे 2 महिण्यांचे पगार अद्दयापही दिले गेले नसून विद्दयार्थी आजही त्या शिक्षकाला आम्हाला शिकविण्यासाठी या म्हणून विनंती करित आहेत.जर शिक्षकाचे वचक एका वर्गावर नाही राहिले तर तो इतका काय मोठा गुन्हेगार झाला,आध्यात्मिक आणि परमार्थिक शिक्षक हा कंत्राटदार असल्याने बाकीचे वर्ग कसे काय सांभाळले आणि त्या वर्गाचे विद्दयार्थी आजही त्यांच्याकडे जाऊन सर तुम्ही या असे का बोलतात यासर्व गोष्टीची पारदर्शकता न तपासता मनाप्रमाणे कारभार सुरू असल्याचे बोलले जात आहे.याच महाविद्दयाल संदर्भात गेल्या 8 ते 10 वर्षापूर्वी मंत्रालय व संबंधित शिक्षणमंत्री,जिल्हास्तरावर अनेक तक्रारी जागा व अन्य विषयावर करण्यात आले होते त्यावेळी संचालक मंडळाचे काही महोदय तक्रारदाराकडे जाऊन धाव घेत प्रकरण थांबविण्याची विनंती केली त्यानंतर ती तक्रार अजूनही प्रलंबितच आहे.माहिती अधिकारासह या महाविद्दयालयाची जुने कागदपत्रे तक्रार यांच्याकडे असल्याचे कळून येत असून नेमकी असा कोणता विषय होता कि संचालक महोदय थेट तक्रारदार यांच्याकडे धावून गेले याबाबत आता पत्रकारही पाठपुरावा करणार असून जनतेसमोर पोलखोलच्या माध्यमातून सर्वकाही प्रकार समोर आणणार आहेत.
Post a Comment