दि,14,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड शहरातील मुरबाड नगरपंचायत इमारतीत भारत वॉईन शॉप गेल्या अनेक महिणे वर्षापासून सुरू असून दिलेल्या परवानगी कोणत्या आधारावर आहेत याचा गुढ मात्र कायमच राहिला असून येथे मिळणारी दारू ही बनावट असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.त्यातच 100 ते 200 मिटरच्या अंतरावर न्यू इंग्लिश स्कूल व महाविद्दयालय आहे,जवळ रहदारी वस्ती असून आजूबाजूला विद्दयार्थ्यांचे क्लासेस आहेत अशातच वॉईन शॉप चालु करण्याची परवानगी देतांना निकषाची तपासणी कोणत्या आधारावर करून दिली,यांसह नुकताच 26 ते 27 जूनच्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्काची चौकशी धाड पडली असता 2 ते 3 तासाच्या चौकशीत नेमकं काय चौकशी झाली,आकडेवारीचा गुढ कायम ठेवण्यात आल्याने याबाबत शासनाचे ओळखपत्र परिधान न केलेले अधिकारी हे खरे की खोटे यावर शंका असून त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उडवा उडवीची उत्तरे देत आमचे कमिश्नर यांनी पत्रकारांना बाईट देऊ नये असे सांगून चेहरा लपवित सुसाट झाले.यासंदर्भात अशी एका तक्रारदारानी मंत्रालयात तक्रार केली असल्याचे कळून येत असून काही राजकीय पुढारी यांनी देखील हे वॉईन शॉप कोणत्याच निकषावर बसत नसल्याचे सांगून पत्रकारांनी या वॉईन शॉपवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावे अशी विनंतीही केली.भारत वॉईन शॉपवर सकाळीच 10 वाजता गर्दी होण्यास सुरूवात होत असते.काही मद्दयप्राशन करणारे 9 वाजताच तेथे थान मांडून बसतांना दिसले आहेत.अलिकडेच शाळा व महाविद्दयालय असून याच रस्त्यावरून मुली,मुलं जात असल्याने अनुकुचित प्रकार घडण्याचा संभव असल्याचे नाकारता येऊ शकणार नाही,दर 15 दिवसाला राज्य उत्पादन शुल्काचे नविन आलेले अधिकारी यांनी आम्ही 15 दिवसांत चौकशीकरिता येत असतो परंतु चालु महिण्यात 15 दिवस होऊन गेले असून राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी अद्दयापही मन्नुभाईच्या वॉईन शॉपची माहिती घेण्यासाठी आलेले नाहीत.टॅम्पो भरलेला त्या दिवशी टॅम्पो मन्नुभाईने डोळयाच्या इशार्याने गायब केला तो टॅम्पो राज्य उत्पादन शुल्कांनी चौकशीत घेतला नाही,अधिकारी गेल्यावर तो टॅम्पो मन्नुभाईंनी पुन्हा आपल्या दुकानासमोरील जागेवर आणला.असे प्रकार पत्रकारांच्या डोळयासमोर घडत असून व्हीडीओ पुरावे बातमीद्वारे देऊनही या वॉईनशॉपवर कारवाई होत नाही,भारत वॉईन शॉपचे मालक मन्नुभाई यांच्यावर कोणत्या अधिकारी,राजकीय पुढार्यांचा आशिर्वाद आहे हे गुलदस्त्यात आहे.याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करण्यात आले असून या वॉईनशॉपनी घेतलेल्या परवानगीसह बनावट दारू विक्री प्रसंगी चौकशी होऊन कारवाई व्हावी व सदर भारत वॉईन शॉपचे लायसन्स रद्द करावे अशी तक्रार तक्रारदारानी केली असल्याने त्या तक्रारदाराचे नाव गुपीत ठेवण्यात आले असल्याचे कळते.
Post a Comment