दि.14,POL,कुणाल शेलार, मुरबाड –
रविवारी मुरबाड कडून माळशेज घाटाकडे जाणाऱ्या रोडवर
मोठ्या प्रमाणात रायडर्सचा धुरळा पाहायला मिळाला.यामध्ये रायडर्स यांच्या गाडीचा वेग
हवेपेक्षाही वेगवान असताना दिसले.त्यांच्या या गाडीच्या स्पीडमुळे अंजनी गॅस एजन्सी
जवळ एका मुरबाडकराचे अपघात होताना टळले या अशामुळे मुरबाड कर त्रस्त झाले आहेत.रायडर्सच्या
गाडीचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने जीवित हानी होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.मुरबाड
कर मात्र रायडर्समुळे त्रस्त झाले असून गेल्या महिन्यात आरटीओ नी मुरबाडच्या ग्रामीण
भागात येऊन गोरगरिबावर मनमानी पद्धतीने खाटेघर गावाजवळील असलेल्या एका झाडाच्या बाजूला
गाडी उभी करून ऑनलाइन दंड मारले होते,परंतु रविवारच्या दिवशी पर्यटक माळशेज घाटा जवळील
पर्यटन ठिकाणी जात असल्याने रायडर्स यांनी गाड्यांचा वेगवान ताफा आणल्याने आता आरटीओ
अधिकारी कोठे आहेत? असा प्रश्न मुरबाडकर विचारत आहेत.दंडात्मक कारवाई केवळ ग्रामीण
भागातील शेतकरी,नागरिकांवर केली जाते परंतु शहरी भागातून येणाऱ्या रायडर्सला आरटीओ
च भय राहिला नसल्याने आरटीओ देखील आता गुमशुदा झालेली आहे.काल रविवार असल्याने हुकूमशाही
करणारे आरटीओ कुठे आहे याबाबत मुरबाडकर आता प्रश्न विचारत आहेत, आरटीओ दडपशाही आणून
हुकूमशाही करते मग बे लगाम असलेल्या रायडर्सला लगाम कोण घालणार असं संतप्त सवाल आता
मुरबाडकर करत आहेत.
Post a Comment