दि,08,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
ठाणे जिल्हयाचे धडाडीचे डॅशिंग ठाणे जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांनी आज मुरबाड तहसिल कार्यालय येथे धावती पाहणी द्वौरा केला असता सदर मुरबाड तहसिलदार कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न झाली.ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे मुरबाडचे पारदर्शक तहसिलदार अभिजीत देशमुख यांनी स्वागत केले.या आढावा बैठकीत मुरबाड तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीसह विविध विभागीय कार्यालयांतर्गत असणार्या कामकाजाचा आढावा घेतला.शेतकर्यांना येणार्या अडचणीसह पीक पहाणी,वारसांच्या प्रमुख विषय माहितीचा यावेळी समावेश होता.ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्हाधिकारी होणे अगोदर एमपीसीबी विभागात महत्वपूर्ण कामकाजाची भूमिका बजावली असून त्यांच्या कार्याला संपूर्ण महाराष्ट्राने जवळून पाहिले आहे.माणूसकी झरी जपून केवळ नागरिकांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांचा प्रभावशाली हतखंडा ठरला आहे.जिल्हयाचा विकास आणि गोरगरिबांच्या समस्या जाणुन घेऊन त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे निरासरण करण्यासाठी त्यांची परखड भूमिका जनतेला ज्ञात असून आजही त्यांच्या प्रभावशाली कार्याने सर्वत्र त्यांची जनमाणसांत स्तुत्य प्रशंसा होत आहे.
मुरबाड तालुक्यात त्यांची धावती भेट जरी असली तरी त्या धावत्या भेटीत सर्व विभागीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी मुरबाड तहसिलदार तथा पारदर्शक कणखर प्रशासक श्री.अभिजित देशमुख,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.कोरडे,मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकीय अधिक्षीक डॉ.संग्राम डांगे,पोलीस निरक्षिक संदीप गिते,वनविभाग,कृषी विभाग,नगरपंचायत विभाग यांसह अन्य विभाग अधिकारी यांची उपस्थिती होती.यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत शासकीय इमारतीसह मुरबाड तालुक्यातील रस्ते यांसह इतर विविध विषयांसंदर्भात आढावा घेण्यात आला.सदर द्वौरा आढावा बैठकीला सर्वच विभागातील अधिकारी,कर्मचारी,मंडळाधिकारी,तलाठी यावेळी उपस्थित होते.या पाहणी द्वौरा संदर्भात पत्रकार कुणाल शेलार यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांच्याशी भेट घेत सदर आढावा बैठकी सदंर्भात त्यांच्या प्रतिक्रिया यावेळी घेतल्या.
Post a Comment