दि,15,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड शहरातील मन्नुभाई यांच्या भारत वॉईन शॉपची बातमी काल प्रसिध्द करण्यात आली होती त्या अनुषंगाने तक्रारदार
यांनी मुख्यमंत्री यांना केलेल्या तक्रारीची दखल मंत्रालयातून घेण्यात आली असून त्याबाबत
राज्य उत्पादन शुल्काचे मंत्रालयीन अधिकारी यांच्याकडे चौकशी करिता तक्रार वर्ग करण्यात
आले असल्याने तक्रारदारांना कळविण्यात आले आहे.सदर तक्रारीत भारत वॉईन शॉपच्या लायसन्स
रद्द करण्यात यावे यांसह अन्य सारांशाचा उल्लेख असून सदर निवेदन पत्र प्राप्त होताच
नेमकी कारवाई कधी होते याकडे आता लक्ष लागून आहे.भारत वॉईन शॉप रहदारी वस्तीत असून
रस्त्याच्या दुकानावर देशी संत्रा दारू मिळू लागली असून याच भारत वॉईन शॉपमधून कॉर्टर
सारखे दारू विक्री करून जादा किमतीत टपर्यांवर मद्दयप्राशन करणार्यांना विक्री केली
जाते.त्याठिकाणी त्यांना दारू मिळते कशी याबाबत गोपिनिय म्हणून एकानी भारत वॉईन शॉप
येथे मद्दयप्राशन करणार्या व्यक्तीचे नाटक करून तेथेच 4 तास थान मांडला असता सदर प्रकार
डोळयासमोर उघड झाला असून नेमकी एका व्यक्तीला किती प्रमाणात दारू विक्री केली जाते
या नियमाकडे लक्ष न वेधता सदर दारू विक्रीतून पैसा कमविण्याकडे लक्ष वेधले जाते.त्यातच
टपर्यावर मिळणार्या दारूकडे राज्य उत्पादन शुल्काची गाडी वळण घेत नसून मुरबाडमध्ये
आल्यास प्रथम गाडी मन्नुभाईच्या भारत वॉईन शॉपवर जाते.दारूचा साठा नगरपंचायतीच्या
इमारतीत असल्याने याच इमारतीमध्ये इतर व्यवसाय करणारे असून शाळा महाविद्दयालय 100 मीटरच्या
अंतरामध्ये आहे त्यामुळे भविष्यात आग लागल्यास मोठी जिवीतहाणी होण्याचा संभव नाकारला
जाऊ शकत नाही.त्यामुळे भारत वॉईन शॉपला कोणत्या आधारावर परवानगी दिल्या आणि त्या
परवानगी किती प्रमाणात खरे आहे किंवा खोटे याची तपासणी आता चौकशी दरम्यान सर्वांच्या
समोर येणार असून राजकीय वरदहस्तांचा आशिर्वाद यावेळी नसेल अशी प्रतिक्रिया तक्रारदारानी
दिली आहे.सदर तक्रार संबंधित अधिकारी तसेच तक्रारदार यांच्या समक्ष व्हावी अशी मागणी
तक्रारदाराकडून आता होत आहे.नेमकी लायसन्सचा काय घोळ आहे याचे गुढ मात्र कायम असून
अनेक जण या प्रश्नाचे उत्तर शोधत असून अंतर्गत राजकीय नेतेच हे वॉईन शॉप अधिकृतरित्या
कोणत्याच निकषात बसत नसल्याचे सांगत आहेत त्यामुळे मंत्रालयाकडुन कोणत्या पध्दतीने
चौकशी होऊन लायसन्स रद्द कोणत्या आधारावर होईल व मालक मन्नुभाई हे यातून कशी पळवाट
काढतील या प्रश्नाचं कोडं लवकरच चौकशीचे पथक आल्यास कळेल त्यामुळे याकडे सर्वांचेच
बारीक लक्ष लागून आहे.
Post a Comment