BIG BREAKING NEWS...

माझा चष्मा आता खाली गेला ; करेक्ट कार्यक्रम होणार - आमदार किसन कथोरे

दि,13,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात मुरबाड विधानसभेच्या विकासाला नवी चालना मिळावी व नवे प्रकल्पांनी माझ्या भागाचा विकास व्हावा या दृष्टिकोणातून विविध प्रकाराच्या मागण्या शासनाकडे केल्या असून ते पुर्णत्वाकडे गेले आहे.याकरिता विकासकामांकरिता निधीची उपलब्धता भरमसाठ असून विविध विषय तारांकित व लक्षवेधी मध्ये मी मांडले आहेत त्यामुळे त्या सर्व विषयांवर राज्य सरकारने लक्ष वेधले आहेत.त्यातच जे प्रकल्प दृष्टिक्षेपात आहेत ते लवकरच पूर्ण होणार आहेत त्यामुळे मी नेहमी विकासाचा विचार करणारा लोकप्रतिनिधी आहे मी टिकास्त्र यांच्याकडे लक्ष वेधत नाही माझे लक्ष केवळ जनतेच्या कल्याणाकडे असून जे सोबत होते,आहेत आणि येतील त्यांना घेऊन पुढे जाऊ अशी प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी काल एका कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्‍नावर दिले आहे.यावर पत्रकार यांनी नुकताच झालेल्या नगरपंचायतीच्या गट निर्माणाबद्दल विचारले असता यावर आमदार श्री.कथोरे यांनी महाराष्ट्रात गाजलेला त्यांचा कडक इशारा माझा चष्मा खाली गेला आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही,वेळेवर करेक्ट कार्यक्रम होणार आहे,कालपर्यंत एकनिष्ठ दाखविणारे आज गद्दार झाले आहेत आणि तुम्हाला मागे आठवत असेल मी काय बोललो होतो ते,जो कोणी गद्दारांना माझ्याकडे घेऊन येल तो सर्वात मोठा गद्दार असेल त्यामुळे अशा गद्दारांबद्दल आपण प्रश्‍न विचारूच नये,जे कोणाचे झाले नाही ते पक्षाचे काय होती अशा कडक शब्दाच्या इशारात आमदार श्री.कथोरे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    आमदार श्री.कथोरे हे समुद्र असून या समुद्रातून चमकणारा कोहिनूर हिरा बाहेर येतो त्यामुळे समुद्रातील पाणी कितीही घेऊन गेले तरी समुद्राचं पाणी आटत नाही,ज्यांची किंमत शुन्य आहे त्यांना विचारणाराही कोणी वाली मिळणार नाही,आपण गाणं एैकलं असेल "चष्मा जाल जेव्हा खाली,सामनेवाल्यांना नाही कोणी णार वाली" या गाण्यातून सर्वकाही सांगितले आहेत की साहेब काय आहेत त्यामुळे आमदार साहेबांचे कार्य खुप प्रगतशील आणि कार्यशील नेते आहेत त्यांनी सर्वांचा उध्दार केला,साहेबांनी प्रेम आणि धर्मयुती पाळली त्यांनी गद्दारकी केली,त्यामुळे करेक्ट कार्यक्रम होण्यास सुरूवात झालेली असल्याच्या प्रतिक्रियाही जिथं तिथं उमटत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post