दि,12,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
ठाणे जिल्हयातील मुरबाड शहरात नुकताच आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत माहेर अॅण्ड नर्सिंग होम हॉस्पिटलचे उद्घाटन शुभारंभ सोहळा पार पडला.24 तास नागरिकांना सुसज्य सेवा देण्याकरिता कटिबध्द झाले असून या हॉस्पिटलमध्ये महिलांची प्रसुती,अपघातग्रस्तांसाठी तात्काळ सेवा,फिजिशियन त्याचबरोबर लहान बालकांकरिता तज्ञ डॉक्टरांबरोबर अन्य डॉक्टर सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने प्रगत काळजी,सर्व विशेषता,एक रूग्णालय मुरबाड तालुक्यातील मुख्य शहरातच उभे राहिले आहे.सध्याची परिस्थिती पाहता लहान बालकांमध्ये ताप,खोकला,सर्दीचे आजारपणाचे लक्षण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत त्यातच बालरोग तज्ञ डॉ.मुकेश पाटील यांच्या कालावधीत नागरिकांना मोठा आधार होता परंतु त्यांच्या जाण्यानंतर अनेक नागरिकांना माझ्या मुलाला कुठं उपचारासाठी नेऊ असा प्रश्नच पडला होता अशातच डॉ.मुकेश पाटील यांच्याच सारखे हाताला गुण असलेले एमडी डॉ.वैभव घाडगे यांनी मुरबाड शहरात आगमन केले असून माहेर हॉस्पिटल येथे 24 तास बालरोग तज्ञ डॉक्टर म्हणून उपलब्ध झाले आहे.कालपर्यंत नागरिकांना तज्ञ व गुणकारी डॉक्टर ग्रामीण भागासह शहराला नसल्याने नागरिक बालकांच्या उपचाराकरिता कल्याण,उल्हासनगर,ठाणे येथे घेऊन जात होते ही माणूसकी माहेर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.स्नेहल वाकचौरे यांनी जपून बालरोग तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता करून मुरबाडमध्ये प्रामुख्याने गरिबातील गरिब घरातील लहान बालकांना चांगले उपचार मिळावे त्यांना बाहेर न जाऊन देण्याची वेळ येऊ नये म्हणून एकाच छताखाली सुसज्ज सुविधांसह बालरोग तज्ञ डॉ.वैभव घाडगे यांना मुरबाड तालुक्यातील लहान बालकांसाठी उपलब्ध करून दिल्याने सर्व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.डॉ.वैभव घाडगे यांच्या माध्यमातून लहान बालकांना उपचार मिळत असून आपल्या कार्यशैलीतून त्यांनी असंख्य बालकांना बरे केले आहे.डॉ.घाडगे यांचे मुख्य वैशिष्टय म्हणजे रात्री-अपरात्री फोन केल्यास तात्काळ फोन उचलून अनेक बालकांच्या उपचारावर मार्गदर्शन करतात.
त्यांच्या कार्यपध्दतीत नर्स,स्टाफ,कर्मचारी हे बालकांच्या उपचाराकरिता माहेर हॉस्पिटलमध्ये प्रयत्नशीलपणे सेवा करत असल्याचे निदर्शनास आले आहे.डॉ.घाडगे हे लहान बालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधतांना दिसले बालकांवर योग्य व चांगल्याप्रकारे उपचार मिळावे अशी त्यांची प्रथम नैतिकतेची भूमिका त्यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.लहान बालकांना कोणताही आजार असल्यास तात्काळ म्हसा रोड लगत असलेल्या 24 तास सुसज्ज माहेर हॉस्पिटल येथे नक्की घेऊन जा आणि आपल्या समक्ष अनुभव घ्या असे आमचे या माध्यमातून तमाम नागरिकांना सांगण आहे.अधिक माहितीकरिता 7620897075 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकता.



Post a Comment