दि,02,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
गेल्या अनेक वर्षापासून भजन,किर्तन,वारीमध्ये तन मनाने स्वतःबरोबर जनतेला गोडी निर्माण करून देणारे एक प्रखड समाजसेवेचे नेतृत्व आत्मसात करणारे,गोर गरिब जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे राहणारे,युवकांच्या गळयातील ताईत असणारे,ज्यांचा सर्वप्रथम मदतीचा हात पुढे येणारे परमार्थिक क्षेत्रातील नैतिकता जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेशदादा पाटील...
समाजसेवेचा पारंपारिक वसा घेऊन पुढे आलेले राजेशदादा पाटील हे टीडीसी बँकेचे संचालक आहेत.त्यांनी ज्यांना ज्यांना खरी गरज आहे अशा नागरिकांना कर्ज मिळवून दिले त्यातच त्यांच्या अंगी असलेली माणूसकी परमार्थिक क्षेत्रातुन निर्माण झाली असून ती परमेश्वराकडून मिळालेली त्यांना देण आहे.नेहमी जनतेच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष लागून राहिलेले असते.
अडचणीच्या काळात कोणीही त्यांना हाक दिली तेथे ते स्वतः मदतीसाठी तत्पर राहिले आहेत.बदलापूर,अंबरनाथ,कल्याण,मुरबाड,शहापूर येथे त्यांच्या समाजसेवी कार्याची चर्चा सदैव राहिली आहे.सर्वगुण निपुण त्यांची ख्याती आहे.राजेश पाटील हे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांचे कट्टर समर्थक असून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक जणांच्या अंधारमय जिवनात प्रकाशाचा ज्योत निर्माण केला आहे.वारकरी यांच्या दिंडी यात्रेत पंढरपूर पर्यंत पायी यात्रा करणारे राजेशदादा पाटील दरवर्षी टाळकरी,माळकरी,वारकरी यांच्या सोबत किर्तनाबरोबर टाळी वाजवत तल्लीन होतात.
परमार्थिक दर्जा त्यांच्यासाठी सर्वप्रथम असून त्यांनी लवकरच वारकरी यांच्या जीवन पटलावर "वारी" हे चित्रपट लवकरच नागरिकांच्या भेटीस येणार असून यामध्ये राजेश पाटील यांचे चिरंजीव हे दिग्दर्शक आहेत.राजेशदादा पाटील हे दरवर्षी हजारो भाविक भक्तगण,सांप्रदायिक वारकरी नागरिकांना तिर्थक्षेत्राची वारी घडवून आणतात.गेल्या 11 ते 12 वर्षापासून हजारो लोकांना काशी,मथुरा,तिरूपती,गोल्डन टेंम्पल,आयोध्या सह महाराष्ट्रातील सर्वच देवस्थानाचे दर्शनाला घेऊन जात असून यावर्षीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त हाँगकाँग,हरियाना यांसह अन्य तिर्थक्षेत्राचे दर्शनासाठी गेले असून चक्क एक हजार नागरिकांचा समावेश आहे.या एक हजार ज्येष्ठ,युवक,नागरिकांना नेऊन आणून नाष्टा,जेवण राहण्याचा खर्च राजेशदादा पाटील यांच्याकडून केला जात असल्याने असा परमार्थिक होणे नसल्याच्या भावनिक भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
या तिर्थदर्शनात मोठया प्रमाणत महिलांचाही सहभाग असून ट्रेन मध्ये सर्वजण सुंदर आवाजाच्या गोडीत टाळ मृदूंगासह भजन गातांना दिसले आहे.यामध्ये राजेशदादा पाटील यांनीही त्यांचा सुर हा तिर्थक्षेत्राच्या दर्शनवारीत लावल्याने ही तीर्थयात्रा अविस्मरणीय ठरणार आहे.राजेश पाटील यांच्यासारखं व्यक्तीमत्व शोधूनही सापणार नाही त्यांना मिळणारा आशिर्वाद लाखमोलाचा असून हजारो भाविकांनी त्यांच्या या समाजसेवी कार्याचे कौतुक केले आहे.
राजेश पाटील यांचे वाढदिवस असून त्यांचे यंदाचे तीर्थयात्रेत होणारे वाढदिवस देवस्थानात दर्शन घेऊन साजरा होत असल्याने हा वाढदिवस कायमस्वरूपी एक हजार भाविकांच्या ध्यानी मनी राहिल यात शंका नसून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे शुभेच्छुक चाहते यांनी त्यांना फोनद्वारे व सोशल मिडीयाद्वारे शुभेच्छा दिल्या असून सर्वत्र चाहत्यांचे राजेश पाटील यांनी आमच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याप्रकरणी आभार मानले आहेत.

Post a Comment