(दि.02,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
विधानसभा मंडळ
ही महाराष्ट्राची आहे आणि या विधानसभेत असलेले आमदार हे महाराष्ट्राचे आमदार आहेत अशी
भूमिका नेहमी मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.किसनराव
कथोरे यांनी विविध विकासनिधी उपलब्ध करून विकासपर्व म्हणून विकासकामे करून एक हृदयस्पर्शी,धडाडीचे कार्यसम्राट आमदार ठरले आहेत.दिलेले शब्द पाळून
माणूसकीची झरी जपणारे आमदार श्री.कथोरे यांनी अनेकांच्या घरातील
अंधकारमय जीवनात तेजोमय प्रकाश निर्माण करून दिले.निराधार महिलांना
मदतीचा हात,गाव खेडे पासून शहराचा विकास,पाणी टंचार्इ दूर,विकासप्रकल्प,कन्यादान परंपरा सुरू,अतिशय दुर्बल घटकांतील जनसामान्यांना
वडील,भाऊ,मुलगा म्हणून मदतीचा हात,जनसमान्यांच्या समस्या जाणून घेत जनता दरबारातून त्यावर तात्काळ उपाययोजना
यांसह असंख्य उदाहरणे आपल्याला सांगता येतील.आमदार महाराष्ट्राचे
असल्याने त्यांच्या दरबारात सर्व धर्म समभावातून कामे होत असून सकाळीच 7 वाजता जनता दरबार आमदार श्री.कथोरे यांच्या संपर्क कार्यालयात
भरला जात असून मोठया गर्दीने नागरिकांची उपस्थिती आपल्या विविध समस्याने घेऊन येतांना
गेल्या अनेक वर्षापासून दिसली आहे.त्यांच्या दरबारात आलेल्या
प्रत्येक नागरिकाला आदराचे मान दिले जात असून जी व्यक्ती जोडली गेली ती तोडली गेलेली
नाही.लांब लांबून नागरिक आपल्या व्यथा गाथा आमदार श्री.कथोरे यांच्या जनता दरबारात मांडतात आणि त्यावर तात्काळ श्री.कथोरे साहेब हे लक्ष वेधून दखल घेत संबंधितांना सुचना देतात.अशीच एक बाब आमच्या समोर निदर्शनास आली.दि.01/02/2024
च्या आमदार श्री.कथोरे यांच्या जनता दरबारात एक
महिला जी आर्थिकदृष्टया कमकुवत असताना तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी आली असता श्री.कथोरे साहेबांनी त्या मुलांच्या शिक्षणाची माहिती घेत त्या महिलेला आजच्या
युगात स्वावलंबी बनविण्यासाठी आणि आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करणार असल्यास
थेट शाळेमध्ये काम करणार का ? करणार असल्यास तत्काळ मी सांगतो
त्या ठिकाणी काम करा अशी थेट सर्वांच्या समोरच त्या महिलेला नोकरी संधी उपलब्ध करून
दिली त्यामुळे श्री.कथोरे साहेबांच्या या निर्णयाने सर्व अचंबित
झाले.यावेळी पत्रकार सौ.मयुरी कुणाल शेलार
यांनी सुध्दा मुरबाड तालुक्यातील ख्रिस्ती समाजाकरिता दफनभूमी जागा उपलब्ध नसल्याने
गंभीर प्रश्न उपस्थित केल्याने आमदार श्री.कथोरे यांनी तत्काळ मी जागा उपलब्ध करून देतो असे शब्द देऊन मुरबाड तालुक्यातील
ख्रिस्ती समाजाचे महत्वपूर्ण प्रश्न श्री.कथोरे साहेबांच्या दरबारात गेल्याने साहेबांनी याकडे मी लक्ष घालून लगेचच पाठपुरावा
करणार आहे असे आश्वासन दिल्याने सर्व ख्रिस्ती समाजामध्ये आनंदाचे
वातावरण पसरले आहे.खिस्ती समाजात एखादी व्यक्ती मयत झाल्यास कुठे
दफन करायचे असा प्रश्न उभा राहत असल्याने त्याबाबत आमदार श्री.कथोरे यांच्यासमोर विचार पत्रकार सौ.मयुरी कुणाल शेलार
यांनी मांडल्याने श्री.कथोरे साहेबांनी या विचारावर लक्ष केंद्रित
केले आहे.या जनता दरबारात श्री.कथोरे साहेबांचे
परखड विचार जरी असले तरी कोणाला निराशा हाती परत पाठविले जात नाही हे स्वरूप सर्वांना
ज्ञात आहे.त्यामुळेच "
साहब के दरबारात जो आता है,वो खाली नही जाता है " हेच पाहायला मिळतंय.लाखो जनतेचे आवाज,हक्काची साथ असलेले आमदार किसनराव कथोरे
यांच्या धडाकेबाज कार्यामुळेच त्यांना कोकणाचे आधारस्तंभ,हृदयस्पर्शी
नेता,गोरगरिबांचे आधारवड वटवृक्ष,कार्यसम्राट
असे म्हंटले जाते.
Post a Comment