BIG BREAKING NEWS...

मुरबाड तालुक्यातील क्लिनीक दवाखाना चौकशी अद्दयापही गुलदस्त्यात...

 

(दि.05,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

मुरबाड तालुक्यात क्लिनीक दवाखाने यांची चौकशी व्हावी असे पत्र संबंधित आरोग्य विभाग कार्यालयाला दिले होते सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अंतिम कागदोपत्राच्या आधारे माहिती प्राप्त झाली असता त्यामध्ये अपुर्या कागदापत्रे असताना मोठया प्रमाणात नियम अटीचे उल्लंघन केले असल्याचे उघड झाले.याबाबत पाठपुरावा सुरू असल्याने सदर आमच्या पत्राच्या माध्यमातून सविस्तर पुनःचौकशी करून कारवार्इची मागणी करण्यात आलेली आहे.मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणच्या क्लिनीकमध्ये विना रजिस्टर मदतनीस काम करित असल्याने त्यांची नोंद मात्र शासनाच्या अधिकृत यादीत नाही,त्यामुळे उपचार घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना सलायन लावण्यासाठी विना रजिस्टर मदतनीस या चौकशी दरम्यान आढळून येतील यात शंका नाही.त्याचबरोबर नागरिकांवर करण्यात येणारे उपचारामुळे एखाद्दयाचा जीव गेल्यास त्याला जबाबदार संबंधित डॉक्टर असेल कि कारवार्इ न करणारे अधिकारी असा गंभीर प्रश्न उभा राहत आहे.प्राप्त माहितीनुसार क्लिनीक दवाखानेसोबतच लॅबच्या चौकशीत लॅब कोणी एक चालवतोय तर सर्टिफिकेट दुसर्याच्या नावावर असल्याने नक्की कारवार्इ का केली जात नाही,कोणाच्या पाठिंब्याने या गोष्टी घडत आहे हे मात्र गुलदस्त्यातच आहे.यासंदर्भात उपोषणाचा इशारा मागे देण्यात आले असता चौकशी करून कारवार्इ करण्यात येर्इल असे आश्वासन दिले असता आजपर्यंत चौकशी धूळीत डांबून ठेवण्यात आलेली आहे.काही ठिकाणी डिग्रीचे अभ्यास मदतनीस करित असून दुसरीकडे नागरिकांवर थेट इंजेक्शन व सलायनच्या माध्यमातून उपचार करित असल्याचे चौकशी दरम्यान समोर येर्इल असे जानकरांचे मत आहे.त्यामुळे मुरबाड तालुक्यातील क्लिनीकसोबत मदतनीस यांच्या प्राप्त असलेल्या माहितीच्या आधारे तत्काळ कारवार्इ करण्यात यावी अशी मागणी पत्रान्वये करण्यात येणार आहे.यावेळी कोणतीही कारवार्इ करण्यासाठी अधिकारी यांनी लक्ष न वेधल्यास स्थगित झालेले उपोषण करण्यात येर्इल अशी विनंती लवकरच पत्रान्वये करण्यात येणार असल्याचे उपोषणकर्ते यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post