BIG BREAKING NEWS...

पीएम किसान सम्मान प्रलंबित समस्या असल्यास माझ्या कार्यालय किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधा ; आमदार किसनराव कथोरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन...

 

(दि.26,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

गेल्या काही महिण्यांपासून पीएम किसान सम्मान योजनेंतर्गत तालुका,ग्रामीण खेडेपाडयातील विविध प्रश्नावली समस्या उद्भवल्या असता याकडे बारकार्इने महाराष्ट्राचे लाडके आमदार किसनराव कथोरे यांनी लक्ष केंद्रित केले आहे.अनेकांचे लॅन्डसिडींग,केवायसी किंवा पात्र लाभार्थी शेतकरी अपात्र झाले असल्याने सदर योजनेंतर्गत त्यांना वर्षाचे मिळणारे 6 हजारापासून वंचित राहावे लागले आहे.अनेक समस्या तक्रारी या पोर्टल किंवा ऑफलार्इनवर प्रलंबित असून या सर्व विषयावर सदैव सर्वांसाठी दार उघडे ठेवणारे सरळ साधे आमदार किसनराव कथोरे यांनी याकडे आपली कडक नजर वळवून थेट त्यांच्यामार्फत पीएम किसान सम्मान समस्या संदर्भात मॅसेज सर्व विधानसभेच्या शेतकऱ्यांसाठी पाठवून जे लाभार्थी काही कारणास्तव अपात्र झाले असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून माझ्या कार्यालयाशी किंवा कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधा असे आवाहन केले आहे.या आवाहनानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरणात त्यांचे या योजनेंतर्गत पात्र म्हणून यादी तयार होत असल्याचे कळून येत आहे.अतिशय साधे सरळ,कोकणाचे आधारस्तंभ म्हणून किसनराव कथोरे यांनी सदैव शेतकऱ्यांसाठी धडाडीचे कार्य केले आहे हे नाकारता येऊच शकत नाही.कार्यसम्राट आमदार तसेच मुरबाड विधानसभेच्या विकासाचे ढाण्या वाघ म्हणून त्यांना नागरिकांनी उपमा दिली आहे.आम लोकांसाठी सदैव अहोरात्र मन आणि दार उघडे ठेवणारे लोकाभिमुख म्हणून ठरलेले आमचे आमदार यांचे कार्य बेभान असून त्यांच्यासारखे कर्तृत्वान महामेरू,विकासपुरूष दुसरे होणे नाही असे येथील नागरिकांनी आमच्याशी बोलतांना म्हंटले आहे.त्यांच्या दालनात गेलेले प्रश्न मार्गी लागत असल्याने समाजशील कार्याच्या पायाभरणीतुन विकासाचे बी उमलले आहे.अशा दनकेबाज दमदार आमदार किसनराव कथोरे यांच्या शेतकऱ्यांच्या पीएम किसान सम्मान योजनेच्या प्रलंबित समस्या निराकरणाकडे लक्ष गेल्याने खर्या शेतकऱ्यांची बंद पडलेली ही योजना पुन्हा चालु केल्याने सर्वत्र शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले असून कोणताही शेतकरी या योजनेंतर्गत वंचित राहू नये अशी पारदर्शक मनोभावना आमदार किसनराव कथोरे यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post