(दि.26,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड तालुक्यामध्ये
एएनएम आणि जीएनएम मुद्दा चर्चेचा ठरत असून क्लिनीक मधील स्टाफ कर्मचारी यांच्याकडेही
लक्ष केंद्रित व्हावे त्यांचीही चौकशी करावी अशी मागणी होत आहे.गेल्या
काही महिण्यापूर्वी चौकशी दरम्यान काही त्रुटी अहवालातुन समोर आले असता एएनएम हा मुद्दा
तक्रारदाराच्या लक्षात न आल्याने सदरचा मुद्दा हॉस्पिटलच्या चौकशीवरून उदयास आला आहे.त्यामुळे चौकशी होत असल्यास सर्वांची चौकशी होणं गरजेचे आहे.एकावर न्याय व दुसर्यावर अन्याय असा भेदभाव होऊ नये
म्हणून सरसकट सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.अलीकडे पावसाळा ऋतु सुरू झाल्याने वातावरणात आजारी रूग्ण भरपूर आढळून येत असतात
अशातच ग्रामीण भागात रूग्णांचे उपचार घेण्यासाठी क्लिनीक येथे गर्दी होतांना दिसत असते
परंतु उपचार करतांना स्टाफ कर्मचारी नेमकी आहे किंवा शिक्षण पात्रता कोणते,एएनएम आहे कि नाही असल्यास नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत आहे कि नाही याची पडताळणी
संबंधित विभागाने करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा तसेच क्लिनीकमधील बेड
संख्या यांचाही आढावा आपल्या अहवालात घ्यावा अशीही मागणी पत्रान्वये करण्यात येणार
असल्याचे सुत्रांकडून कळाले आहे.यावर विभाग अधिकारी कशापध्दतीने
चौकशी करते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.(क्रमशः)
Post a Comment