(दि.15,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड शहरातील नामांकित तसेच अनेक वर्षापासून जूने असलेले स्नेहल म्हात्रे यांचे आशिर्वाद मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट मध्ये काल रात्री चोरटयांनी शेटर फोडून चोरी केल्याचे भयानक घटना घडली आहे.मुरबाड बाजारपेठ मधील मामा शहा यांच्या शेजारी व मुरबाड कोर्टासमोर असलेले आशिर्वाद मेडिकल असून येथे नागरिक गोळया औषधे घेण्यासाठी येत असतात सर्वांशी जवळचे संबंध जपणारे स्नेहल म्हात्रे यांचे हसरा स्वभाव सर्वांना ज्ञात असून अशी चोरीची घटना प्रथमच घडल्याने ही बाब जनतेला सकाळी कळाल्याने सर्वांनी त्यांची भेट घेतली आहे.
सविस्तर वृत्त असे की मध्यरात्री 2 ते अडीच वाजेच्या
सुमारास अज्ञात 4 ते 5 चोरटयांनी त्यांचे
मेडिकल स्टोअर्सचे शेटर वाकवून चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.सदर घडलेल्या घटनेची माहिती सकाळी या मेडिकलचे मालक स्नेहल म्हात्रे यांना
कळताच त्यांनी मेडिकल येथे धाव घेतली असता तेथे तेव्हा त्यांनी सर्व ठिकाणी पाहणी केली
असता आपली लॉकर चोरी झाली असल्याचे कळाले.त्या लॉकरमध्ये
1 ते सव्वा लाखाची रक्कम असल्याची माहिती दिली.घटना घडल्यानंतर मुरबाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तपास सुरू केले
असता चोरटयांनी मोठेच आवाहन मुरबाड पोलिसांना दिले असल्याचे या घटनेवरून म्हणता येर्इल.सदर सीसीटीव्ही कॅमेरेत तरूण चोरटे कैद असून चोरटयांनी लॉकरच लंपास केली असल्याचे
दिसून आले आहे.मुरबाडमध्ये घरफोडी,दुकानफोडी
झाल्यात परंतु ही बाजरपेठेमधील मेडिकलफोडी पहिलीच घटना असेल की जी घडली असावी.याघटनेमुळे चोरी प्रकरणात वाढ होण्याचे संकेत चोरटयांनी दिले असून यावर पोलिस
यंत्रणा कशापध्दतीने या चोरटयांचा तपास करून त्यांना जेरबंद करतील असा प्रश्न मेडिकल मालकासह सर्व नागरिकांना पडला आहे.चोरटयांनी
पुन्हा आपले डोके वर काढले असून सुरक्षेचा प्रश्न मात्र उपस्थित
राहिले असून नेमकी हे चोरटे कुठले ? भुरटे की जवळचे असे अनेक
प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहे.या घटनेचे
लवकरच पोलिसांनी तपास करून चोरटयांना अटक करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी स्नेहल
म्हात्रे यांच्यासह सर्व नागरिकांनी केली आहे.
Post a Comment