BIG BREAKING NEWS...

एटीएम अदलाबदल करून फसवणूक कराणार्या आरोपीला अंबाझरी पोलीसांनी केले 72 तासातच अटक...

 


 (दि.27,POL - नागपूर)

नागपूर शहर हद्दीतील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रविनगर येथील परिसरात एसबीआय बँक एटीएम मध्ये  फिर्यादी पांडुरंग नारायण कुर्वे हे घरगुती खर्चाकरिता पैसे काढण्यासाठी गेले त्यांचे एचडीएफसी एटीएम कार्डातून एसबीआय एटीएम मधून पैसे बाहेर काढून येत असताना आरोपी एटीएम मध्ये आला व मेरे पैसे नही निकल रहे है,आपकी रिसिप्ट फसा हुआ है,आप रिसिप्ट निकाल लो इसिलिए आप आपका एटीएम कार्ड फिर से स्वॅप करो,तभी रिसिप्ट निकल जाशगी असे म्हणून दिशाभूल करून परत एटीएम कार्ड स्वॅप करण्यास सांगितले त्याद्वारेच आरोपी याने फिर्यादीचा पिनकोड माहिती करून घेऊन त्यात एटीएमची अदलाबदल केली व थोडयावेळाने फिर्यादीचे एटीएमद्वारे 4 वेळा स्वॅप करून 90 हजाराची रक्कम काढून आर्थिक फसवणूक केली.सदरची घटना फिर्यादीला काही काळानंतर कळाल्याने अंबाझरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले.सदर घडलेल्या घटनेची परिपूर्ण माहिती वरिष्ठ अधिकारी महोदयांना कळविण्यात आली असता सदर तपास अधिकारी व तपासात मदत करणारे पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल,नागपूर शहर,सह पोलीस आयुक्त श्रीमती.अश्विती दोरजे,अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे,उत्तर प्रादेशिक विभाग,पोलीस उपायुक्त राहुल मदने परिमंडळ 02,सपोआ सुधिर नंदनवार,सिताबर्डी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक माहितीच्या आधारे सदर आरोपी उत्तरप्रदेश येथे असल्याचे समजले.वरिष्ठांच्या परवानगीने सदर तपास पथक रवाने झाले व सदर आरोपीतांना ताब्यात घेतले.सदर आरोपींनी सदर केलेला गुन्हा कबुल केले असता आरोपी यांचेकडून 20,38,000 रू चा मुद्देमाल गुन्हयात जप्त करण्यात आला.अशाप्रकारे मोठया धाडस आणि बुध्दिबळाने केवळ 72 तासातच अंबाझरी पोलीसांनी सदर एटीएम प्रकरणातील ज्येष्ठ नागरिकांच्या 90 हजाराची फसवणूक करणा-या सय्यद खान कमालउद्दीन खान,आलोककुमार बालकृष्ण गौतम,मोहम्मद कलीम वल्द मोहम्मद नसिम अशी आरोपींची नावे असून त्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहेत.या गुन्हयाची उकल करण्यासाठी वपोनि.विनायक गोल्हे,सपोनि.मंगेश डांगे,परि.उपनि.नवनाथ र्इसाये,पो.हवा.अबय पुडके,पो.हवा.मुनिन्द्र युवनाते,पोना.दिनेश जुगनाके,पोशि.अमित भुरे,पोशि.अंकुश घटी,पोशि.प्रविन शिंदे,पोशि.उज्वल पाटेकर,पोशि.सतिश कारेमोरे,पोशि.अशिष जाधव,पोशि.रोमीत राऊत,पोशि.विक्रमसिंह ठाकुर यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीकडून सर्वत्र नागरिकांकडून प्रशंसा होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post