(दि.17,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
कोलकाता येथे
महिला डॉक्टरावरील झालेल्या निघृण हत्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटत असून महाराष्ट्रातही
या घटनेचा निषेध केला जात आहे.ठाणे जिल्हयातही ठिकठिकाणी डॉक्टरांनी संप पुकारला
आहे.खाजगी डॉक्टरांनी देखील वैद्यकीय सेवा आणि ओपीडी बंद केली
असून पुढील 24 तासासाठी संप पुकारले आहे.भिवंडी येथील इंदिरा गांधी स्मृती रूग्णालय येथील डॉ.पंदारे मॅडम यांच्यासह डॉक्टर्स,नर्स स्टाफ,कर्मचारी यांनी कॅन्डल लाईटद्वारे या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे तसेच
मुरबाड शहरातील हॉस्पिटल व क्लिनीक दवाखाने येथील डॉक्टरांनी घडलेल्या घटनेचा तीव्र
निषेध व्यक्त करून मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.बाबर यांना सदर निषेध निवेदन दिले आहे.
कोलकाता
घटनेच्या निषेधार्थ शेकडो डॉक्टर आज रस्त्यावर उतरले आहेत.या घटनेची
सीबीआय चौकशी करून आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे.डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून खून केलेल्या प्रकरणी देशभरात पडसाद उमटले असून
शहरातही कोलकात्यातील घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहेत.
Post a Comment