BIG BREAKING NEWS...

कुणबी समाज सेवा संघ बदलापूरच्या वतीने गुणवंत विद्दयार्थी सत्कार सोहळयाचे आयोजन ; महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्यासह अन्य प्रमुख पाहुणे राहणार उपस्थित

 

(दि.17,POL - कुणाल शेलार, बदलापूर)

कुणबी समाज हा कोकणात मोठा समाज मानला जात असून या समाजातुन प्रतिष्ठित युवकांनी गगनझेप भरारी घेतली आहे.सर्वत्र ठिकाणी पसरलेल्या कुणबी समाजाच्या विविध संघाकडुन गुणवंत विद्दयार्थ्यांचा सत्कार सोहळयाच्या माध्यमातून त्यांचा गौरव केला जातो.ठाणे जिल्हयातील तालुक्यात कुणबी समाजाचे होतकरू व बुध्दिवान युवकांची फळी आज निर्माण झाली आहे.विद्दयार्थी घडला म्हणजे प्रगतीकडे वाटचाल असून विविध क्षेत्रातुन आज कुणबी समाज बालाढय म्हणून नावारूपाला आले आहे.दहावी,बारावी,पदवी,पदविका व पदव्युत्तर शैक्षणिक परीक्षा उतींर्ण झालेले कुणबी समाजाचे युवक युवती कशातच कमी नसून त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना पुढील उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत गुणवंत विद्दयार्थ्यांचा सत्कार कुणबी समाजाकडून करण्यात येत असतो अशाच सत्कार सोहळयाचे आयोजन कुणबी समाज सेवा संघ बदलापूरच्या वतीने दि.22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आदिती बॅक्वेट हॉल(मांडवकर हॉल),ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावर सानेवाडी,बदलापूर(प) येथे केले आहे.या आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लाडके व मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून मोलाचे मार्गदर्शन आमदार श्री.कथोरे विद्दयार्थ्यांना देणार आहेत त्याचबरोबर या व्यासपिठावर अन्य प्रमुख मान्यवरही या बहरदार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.या सत्कार सोहळयातील पात्र विद्दयार्थ्यांनी आपली नावे गुणपत्रिका अथवा प्रमाणपत्राची छायांकित प्रत दि.18 सप्टेंबर 20214 रोजीपर्यंत खालील नमुद समाजबांधवांकडे प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवावे असे आवाहन कुणबी समाज सेवा संघ बदलापूर मंडळाच्या कार्यकारिणीचे सदानंद सुरोशे(अध्यक्ष),अरूण मुंढे(उपाध्यक्ष),भालचंद्र ठाकरे(सचिव),कृष्णा घोरड(खजिनदार),दिलीप बोराडे(माजी अध्यक्ष) यांच्यासह अन्य कार्यकारिणी मंडळ प्रमुख सदस्यांनी केले आहे.

 

 समाजबांधवांकडे प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून खालीलप्रमाणे संपर्क साधावा.

1.       डॉ.ज्ञानेश्‍वर मगर सर (8149690359)

2.       श्री.रमेश बुटेरे सर (9082502062)

3.       श्री.शशिकांत डोहळे सर (9422485754)

4.       डॉ.दिनेश चौधरी सर (8450963001)

5.       श्री.सुनिल पाटोळे सर (9881419799)

6.       श्री.भाऊ हरड सर (9272267854)

Post a Comment

Previous Post Next Post