दि.23,POL,कुणाल शेलार,मुरबाड
कालचा मुरबाड ग्रामीण रूग्णालय आणि आजचा मुरबाड ग्रामीण रूग्णालय यामध्ये महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट आमदार श्री.किसनराव कथोरे यांच्या पुढाकाराने कायापालट झालेला दिसून येत आहे.ठाणे जिल्हयातील अन्य ग्रामीण रूग्णालयासह मुरबाड ग्रामीण रूग्णालय विविध पुरस्कार घेत नामवंत ठरला आहे.अगोदर औषधासह डॉक्टरांची कमतरता होती,स्त्री प्रसुती गंभीर असताना सीसेक्शन करिता सेंट्रल येथे नेण्यात येत होते परंतु याकडे आमदार श्री.किसनराव कथोरे व ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी अतिशय बारकार्इने लक्ष केंद्रित करून जातीने संयुक्तपणे पुढाकार घेतले अन आज मुरबाड ग्रामीण रूग्णालयात सुसज्ज सेवा उपलब्ध झाल्या.आमदार किसनराव कथोरे,ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार इतवर न थांबता 30 खाटांचे असलेल्या रूग्णाला 100 खाटांचे रूग्णालय म्हणून करण्यासाठी विशेष मेहनत घेतले आणि त्यांच्या मेहनतीसह पाठपुराव्याला शासनाने विस्तारीत ट्रामा केअरसह मुरबाड ग्रामीण रूग्णालय असे दोन्ही मिळून 100 खाटांचे रूग्णालय दृष्टिक्षेपात ठेवून मंजूरी दिली आहे त्यामुळे आता मुरबाड ग्रामीण रूग्णालय उपजिल्हा रूग्णालय अर्थात श्रेणीवर्धनमध्ये रूपांतर होणार असून विशिष्ट तज्ञ डॉक्टरांचीही पदभरती होेणार आहे.नागरिकांना उत्तम सुसज्ज सेवा उपलब्ध व्हावेत याकरिता शासनाकडे जेव्हा जेव्हा पाठपुरावा आमदार श्री.कथोरे यांनी केला तेव्हा तेव्हा भरमसाठ निधी उपलब्ध झाला आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयावर आमदार श्री.कथोरे यांचे फार प्रेम असल्याने कित्येक वेळा त्यांच्या भेटी झाल्या आहेत. ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांचेही विविध मार्गदर्शनपर शिबीराला प्रामुख्याने उपस्थिती दर्शवून शासनाच्या आरोग्यमय योजना गरिब गरजू नागरिकांपर्यत पाहोचविण्यासाठी प्रयत्नशीलतेसह यशस्वी झालेले आहेत.
नुकताच याच ग्रामीण रूग्णालयात अलीकडे नेत्र शल्यचिकित्सक डॉ.प्रसन्नकुमार देशमुख यांनी प्रभावशाली कामकाम केले असता त्यांच्याजागी पुणे जिल्हयातील दौंड तालुक्यात कोरोना काळात अतिशय धडाडीचे कार्य करणारे देवदूत नेत्र शल्यचिकित्सक डॉ.संग्राम डांगे यांनी काम हाती घेत अनेकांचे जीव बचाविले आहे.या कोराना काळात त्यांच्या अंतर्गत चक्क 700 बेडच्या रूग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले असून त्यांची बदली थेट मुरबाड ग्रामीण रूग्णालयात झाली असून जनसेवा हिच र्इश्वर सेवा अशी भावना जोपासून मुरबाड तालुक्यातील नागरिकांना सेवा देण्याचे दुरदृष्टी योजना आखली आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयात त्यांनी पदभार स्विकारताच आमदार किसनराव कथोरे,जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्याकडे डायलेसिस सेवा सुरू व्हावेत म्हणून पाठपुरावा केला याच पाठपुराव्यादरम्यान आमदार श्री.कथोरे यांच्याकडे पहिल्याच भेटीत सविस्तर वस्तुस्थिती मांडत सांगितली असता आमदार श्री.कथोरे,जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या संयुक्त विद्दयमाने आज मुरबाड ग्रामीण रूग्णालयात डायलेसिस सेवा उपलब्ध होऊन त्याचा मोफत लाभ मुरबाड ग्रामीण रूग्णालयातुन मिळत आहेत.ज्या नागरिकांना डायलेसिस सेवा घेण्याकरिता कल्याण,ठाणे,मुंबर्इ येथे जावे लागत होते ती पायपीट दगदगीची हेलसांड थांबली आहे.डायलेसिस सेवा 22/11/2024 रोजी सुरू झाली असता 5 मशिनी याठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत.नागरिकांपर्यंत याची वार्ता कळताच आजपर्यंत 174 डायलेसिस रूग्णांना सेवा मिळाली आहे तर 15 रूग्णांची नोंद झाली असून चालू जानेवारी 2025 महिण्यात चक्क 66 डायलेसिस रूग्णांना सेवा देण्यात आलेली आहे यामुळे रूग्णांचे लाखो रूपये वाचले असून या मोफत सुविधेचा लाभ रूग्णांना मिळत आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकिय अधिक्षीक तथा नेत्र शल्यचिकित्सक डॉ.संग्राम डांगे यांचा सुपरफास्ट दांडगा अनुभव रूग्णांच्या सेवेला मिळत असल्याने या रूग्णालयात लवकरच रक्त साठवणूक केंद्रही कायमस्वरूपी होणार असून त्याची सुरूवात लवकरच होर्इल तसेच या रूग्णालयातुन दृष्टिहिनता व अस्थिव्यंग (अपंग व्यक्ती) नागरिकांना दर 4 थ्या गुरूवारी प्रमाणपत्र देण्यात येणार असून आता थेट ठाणे येथे जायाची अवश्यक्यता नसणार आहे याचा लाभ सर्वत्र दृष्टिहिनता व अस्थिव्यंग (अपंग व्यक्ती) यांनी घ्यावा असे आवाहन आमच्याशी बोलतांना वैद्दयकिय अधिक्षीक तथा नेत्र शल्यचिकित्सक डॉ.संग्राम डांगे यांनी केले आहे.आज मुरबाड ग्रामीण रूग्णालयात आमदार श्री.कथोरे तसेच ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या प्रयत्नाने त्याचबरोबर 24 तास नागरिकांना सेवा देणारे मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकिय अधिक्षीक तथा नेत्र शल्यचिकित्सक डॉ.संग्राम डांगे यांच्या अधिपत्याखाली मोफत लॅब तपासणी होते ही लॅब एचएचएल हिंद लॅब एलटीडी यांच्या संयुक्ट विद्दयमाने रूग्णांना सुविधा देणेसाठी व त्यांच्या सेवेसी सुरळीत सुरू आहे.
औषधाचा मोठया प्रमाणात साठा,डॉक्टरांची 24 तासाची उपलब्धता,अस्थिरोग तज्ञ,स्त्री रोग तज्ञ,भूलतज्ञ,नेत्रशल्यचिकित्सक तज्ञ यांसह विविध डॉक्टर,कर्मचारी,शिपार्इ सेवेसाठी तत्पर असून बाहृयरूग्ण,अंतरूग्ण,एक्सरे,प्रयोगशाळा तपासणी,कुष्ठरोग निदान उपचार,टीबी निदान उपचार,कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया,सिसेक्शन ऑपरेशन,सर्पदशं व विंचूदंश अति गंभीर रूग्णांना अतितातडीची सेवा,24 तास प्रसुती सेवा,डायलेसिस सेवा यांसह अन्य उपलब्ध सेवा मुरबाड ग्रामीण रूग्णालयातुन नागरिकांना मिळत आहेत.या ग्रामीण रूग्णालयाचे सध्याचे काम आमदार किसनराव कथोरे व ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या प्रयत्न पाठपुराव्यातुन जोमाने सुरू असून लवकरच ग्रामीण रूग्णालयाऐवजी उपजिल्हा रूग्णालय असे नाव ठाणे जिल्हयात ओळखले जाणार आहे त्यामुळे मुरबाडचा नवा लुक कायापालटेचा ऐतिहासिक भाग म्हणून नोंदविला जार्इल यात तिळमात्र शंका नाही.
मुरबाड ग्रामीण
रूग्णालयाचे वैद्दयकिय अधिक्षीक तथा नेत्र शल्यचिकित्सक डॉ.संग्राम डांगे यांनी
आपले पदभार स्विकारताच मुरबाड ग्रामीण रूग्णालयात नवनविन सुविधा नागरिकांना मिळावे
म्हणून सदैव प्रयत्न केले असता त्यांचे एकही प्रयत्न अपयशी म्हणून न ठरता यशस्वीच
ठरले आहे त्यांच्या कार्याची जिल्हा,तालुकास्तरावर
प्रशंसेच्या कौतुकांचा वर्षाव होत आहे.
Post a Comment