BIG BREAKING NEWS...

ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांना मातृशोक...

दि.29,POL,कुणाल शेलार,मुरबाड

ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांचे मातोश्री गेंदाबाई पवार यांचे सोमवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांचे वय 95 इतके होते.गेंदाबाई पवार यांनी अपार कष्ट करून मेहनतीने आपल्या कुटूंबाला सांभाळून सामाजिक कार्य केले आहेत.त्या गोरगरिब जनतेच्या मायमाऊली होत्या.हजारो व्यक्तिमत्वाच्या जीवनात प्रकाशाचे झोत निर्मान करून त्यांना संस्काराचे मोती दिले आहेत.त्यांनी सदैव जनसामान्यांची सेवा केली असून त्यांचे आशिर्वाद लाभल्याने अनेकांचे जीवन बदलले आहे.सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी जोपासल्याने त्यांच्या हातून जी सेवा जनमानसांत झाली ती अविस्मरणीय आहे.माणूसकी झरी जपत असताना समाजाला आपल्याला काहीतरी देणं लागतं म्हणून आपल्या समाजसेवेचा वारसा आपल्या मुलांना दिला त्याच संस्कार वारसेच्या छत्रसावलीने आज त्यांचे सुपुत्र ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या हातून लाखो रूग्णांना सुसज्ज व शासनाच्या माध्यमातून मोफत उचार शस्त्रक्रिया करून देण्यास अहोरात्र सामाजिक बांधिलकी जपतांना संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.आज ठाणे जिल्हयातील गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करून त्यांचे दुखः आपले असून आपल्या कुटूंबातील सदस्य म्हणून जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी धडाडीचे कार्य केले आहेत हेच कार्य त्यांचे मातोश्री गेंदाबाई पवार यांच्या वारसाने पुढे घडत असल्याने मायमाऊली गेंदाबाई पवार यांचीच आठवण डॉ.कैलास पवार यांच्या समासजसेवी कार्यातून प्रत्येकाला येत असल्याने आजही आमच्या मायमाऊली डॉ.कैलास पवार यांच्या समाजसेवी कार्यातून आमच्यात आहेत व राहणार अशा भावना जनतेकडून व्यक्त केल्या जात आहेत.जगात आल्यावर असे काही काम करावं की जनतेने ते कधीही विसरता कामा नये अशीच जनसामान्यांसाठी समाजसेवी कार्यात गेंदाबाई पवार यांचे कार्य कौतुकास्पद ठरले असून त्यांच्या प्रत्येक कार्याची आठवण मात्र कधीही विसरली जाऊ शकणार नाही.गेंदाबाई पवार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले सर्वत्र घटकांत एकच दुखःचे सावट पसरले असून त्यांचे अंत्यसंस्कार जळगाव जिल्हयातील आंबेवड येथे करण्यात आले आहे.गेंदबाई पवार यांच्या पश्‍च्यात डॉ.कैलास पवार(मुलगा),सुभाष पवार(मुलगा),संध्या पवार(सुन),अर्चना पवार,नातवंडे सार्थक,अश्का,डॉ.पुजा,साई असा परिवार आहे.

ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या मातोश्री गेंदाबाई पवार यांचे निधन झाल्याने त्यांना मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे यांनी मायमाऊली मातोश्री गेंदाबाई पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केले आहे.तसेच मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे नेत्रशल्यचिकित्सक तथा वैद्दयकिय अधिक्षीक डॉ.संग्राम डांगे यांच्यासह सर्व डॉक्टर,परिचारिका,कर्मचारी यांनीही आपल्या रूग्णालयात भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post