दि,19,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
आज अखंड भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती.या जन्मोत्सवात संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण पसरले असून प्रत्येक ठिकाणी जयंती मोठया उत्साहात साजरी केली जात आहे.ज्या राजांनी स्वराज्य स्थापन केलं ज्यांनी शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हणून अभिमान मिळवून दिला,जे राजं 18 पगड जातींना एकत्रित घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतात अशा अराध्य दैवताची तारखेप्रमाणे जयंती साजरी होत असतांना ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील नामवंत व फेमस असलेले चित्रकार सचिन पोतदार यांनी भाकरीवर श्री छत्रपती शिवाजी महारांजाचे चित्र साकारून त्यांना अभिवादन केले आहे.गेल्या अनेक वर्षापासून ते चित्र काढत असून त्यांच्या कलेला विविध स्तरातून वाव मिळाली आहे.
हुबेहुब हस्ताने अनेक चित्र सचिन पोतदार यांनी
आजपर्यंत काढले आहेत.त्यांच्या या कलेतून त्यांनी आज वेगळीच कला साकारून भाकरीवर श्री
छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढले आहे.त्यांनी या भाकरीवरच्या शिवचित्राने एकच
संदेश दिला की राजं आज शेतकरी राजा केवळ आणि केवळ तुमच्यामुळेच आहे.सचिन पोतदार यांनी
साकारलेल्या भाकरीवरील चित्राची चर्चा सर्वत्र होत असून नागरिकांनी ते पाहण्यासाठी
गर्दी केली होती.
Post a Comment