दि,08,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
या जगात कोणीच कायमचा
राहण्यास आलेला व्यक्ती नाही.आज आहे उद्दयाचा भरवसा नाही त्यामुळे आपले सत्कर्म या
प्रत्येक घटकांत रूजले पाहिजे आणि त्याकरिता समाजसेवा ही आपल्या हातून झाली पाहिजे.या
जीवनात आलोच आहे तर सोबत काहीच जाणार नाही जाईल तर फक्त चांगल्या व्यक्तीची छाप.जनतेची
सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य आणि हेच आपले माणूसकीचे धर्म अशी मनोभावना मनात रूजवून
गेल्या अनेक वर्षापासून कर्तव्यदक्ष असलेले ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार
यांनी लाखो जनतेचे मने जिंकून घेतली आहेत.निस्वार्थमनाचे आणि सदैव जनतेच्या प्रश्नावर
लक्ष केंद्रित करून त्यांचे आरोग्य सुखमय आणि आनंदी कसे राहिल याकरिता अहोरात्र झटतांना
दिसले आहेत.गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य विभागात त्यांच्या कार्याचा हातखंडा असून
तळागळातील जनतेपर्यंत त्यांनी शासनाच्या सुविधा पोहोचविण्यास विशेष कार्य केले असल्याचे
पाहायला मिळाले आहे.ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखले जात
असून 7 महानगरपालिका असलेल्या या जिल्हयाच्या ग्रामीण भागातील रूग्णालयाचा कायापालट
होतांना सर्वांनी पाहिलं आहे.वेळोवेळी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन तेथील समस्या अडचणी
जाणून घेऊन सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच योगदान हा नाकारलाच जाऊ शकत
नाही.त्यांची नैतिकता ही अधिकारी वर्गाची ताकद आहे त्यामुळे त्यांनी सदैव जनतेसह अधिकारी
वर्गाला मी कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही अशी सदभावना अंगी बाळगली आहे.त्यांना महाराष्ट्राचे
लाडके आमदार किसनराव कथोरे यांची सदैव साथ ही मिळाली असून जनतेच्या कल्याणाला सदैव
प्रथम प्राधान्य दिलं आहे.सर्वांना आपल्या छत्रसावली सामावून घेऊन त्यांना मायेची ऊब
देणारे ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी जनतेच्या सेवेची निष्ठा कधी सोडली
नाही.रात्री 2 वाजता जरी एखाद्दया रूग्णाच्या नातेवाईकांचे समस्या अडचणीचे फोन गेल्या
त्याच क्षणी स्वतः त्या समस्यांचे निपटारा करतात व त्यांना समाधानकारक न्याय मिळवून
देतात.खोटी गोष्ट त्यांना पचत नाही त्यामुळे ते सदैव चर्चेत राहिले आहे.मुरबाड ग्रामीण
रूग्णालयात झालेला कायापालट व उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधा नागरिकांना सुखकर मिळू
लागल्याने त्यांचे बारकाईचे लक्ष हेच सांगून जात आहे की असे जिल्हा शल्यचिकित्सक
दुसरं कोणी होणं नाही.

Post a Comment