दि,08,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
महाराष्ट्राचे लाडके,मुरबाड
विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांनी शुक्रवारी विधानसभेत
पुरवणी मागण्यांच्या पाठिंब्यातून महत्वपूर्ण मागण्यां मांडून त्यावर अध्यक्ष महोदयांचे
लक्ष केंद्रित करून घेतले आहेत.या मागणीत अनेक मागण्यां मांडल्या असून मुरबाड तालुक्यातील
तालुका दिवाणी न्यायलय इमारत नवीन बांधण्याकरिता प्रस्ताव व निधी उपलब्ध करून देण्यासाठी
तारांकित प्रश्न मांडले.सदर आपल्या पुरवणी मागणी मांडत असतांना दिवाणी न्यायलय मुरबाड
जीर्ण झाल्याची अवस्था आमदार श्री.कथोरे यांनी मांडली.गेल्या सन 2015 पासून सदर प्रस्ताव
तयार असून सदरचा प्रस्ताव सादर केला गेला असून त्या प्रस्तावाला अजूनही मान्यता मिळालेली
नाही.तालुका दिवाणी न्यायलय ही 100 वर्षापूर्वी जूनी असून ती इमारत नव्याने बांधण्यासाठी
पूर्णतः प्रस्ताव सादर केलेले असून ही इमारत होणं गरजेचं आहे त्यासाठी सार्वजनिक बांधकाम
विभाग,जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून सदरील प्रस्ताव येणं बाकी असून सदर प्रस्ताव
लवकरात लवकर मागवून त्याला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी आमदार किसनराव कथोरे
यांनी अध्यक्ष महोदयांच्या माध्यमातून केली.यावर लवकरात लवकर प्रस्ताव मागवून आपली
पुरवणी मागणी पूर्ण करण्यात येईल असे यावेळी संबंधित मंत्री महोदयांनी सांगितले आहे.मुरबाड
विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांनी केलेला विकास आणि मुरबाड विधानसभेत
झालेला विकास उभ्या महाराष्ट्रानी पाहिला आहे त्यामुळे मुरबाड विधानसभेत विकासाचे वारे
अजून जोराने वाहू लागेल यात शंका नाही.
Post a Comment