दि,05,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट
आमदार किसन कथोरे यांच्या विकासकामांचा डंका वाजतच असून कोटयावधी रूपयाचे निधी मुरबाड
विधानसभेमध्ये आणून विकासाचे वादळ जोमाने फिरू लागले आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अत्यंत जवळील निकटवर्तीय व एकनिष्ठ असलेले आमदार श्री.कथोरे
यांच्या जोरदार विकासात्मक भूमिकेची प्रशंसा केली असून पाणी,आरोग्य सुविधा,रस्ते,पर्यटन
स्थळ,शैक्षिणिक,शासकीय योजना समृध्दीची भर या मुरबाड विधानसभेत केली असून आमदार श्री.कथोरे
यांनी केलेल्या कार्याला गेल्या 25 वर्षात विरोधात्मक भूमिकेने तोड दिली नाही.जे मंत्री
करू शकत नाहीत ते कथोरे साहेब करतात या वाक्याने सर्व मंत्रीना मुख्यमंत्री श्री.फडणवीस
यांनी बदलापूर येथील झालेल्या कार्यक्रमात आमदार किसन कथोरे यांची ताकद किती आणि त्यांना
किंगमेकर गेम चेंजर का बोलतात याचे मार्मिक उदाहरणच दिले आहे.ज्यांचा उध्दार केला ते
कालपर्यंत जवळचे आज लांब जरी गेले असतील तरी येथील वटवृक्ष ढासळलेला नाही,हा वटवृक्ष
मजबूत असून नव्या पालव्यांना जन्माला घालतो त्यामुळे काहींना पुढे काय होईल याची
धास्ती थोडीफार का होईना लागली असेलच.विकासाच्या गतीत आणि मायभूमीच्या मातीत आमदार
श्री.कथोरे यांचे कौतुकास्पद कामगिरी तमाम जनतेसह अखंड महाराष्ट्राने पाहिली आहे त्यामुळे
रोजगार संधी स्थानिकांना मिळण्याची आखणी आता आमदार श्री.कथोरे यांनी मांडली असून याबाबत
त्यांच्याशी संवाद साधले असता त्यांनी मुरबाड कल्याण महामार्ग रस्त्याचे काम जोमाने
सुरू असून मुरबाडचं लुक हा बदलला आहे आणि त्यातच आमच्या युवक युवती माझ्या भाऊ बहिणींना
रोजगार उपलब्ध व्हावेत म्हणून गोडाऊन लवकरच आणणार आहे त्यामुळे विकासासह रोजगाराला
चालना मिळणार असून सदर गोडाऊन पोटगाव पासून मडकेपाडा गावाजवळ सुरू करण्यात येणार आहे.यावेळी
मुरबाडच्या विकासाची आपण रचना केली तर अलीकडे मामणोली कल्याण तालुक्यात असून विकास
समोर आहे तर दुसरीकडे कर्जत तालुक्याचा विकास,तिसरीकडे शहापूर मार्गासमोरील विकास,चौथी
म्हणजे माळशेज घाटानंतर नगरकडील विकास अशा चार कोपर्यातील विकासात मुरबाडचा विकास
का मागे राहिल त्यामुळे माळशेज घाटातील काचेचा पुल जो दृष्टिक्षेपात होता त्याला देखील
अधिवेशनात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दाखविला आहे त्यामुळे 100 वर्षाचा
पुढील विकासाचा दृष्टिकोण येणारी पिढी लक्षात ठेवेल हेच माझे ध्येय असल्याचे आमदार
श्री.कथोरे यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.
Post a Comment